रस्त्यावर किंवा हायवेवर वाहनाच्या धडकेने मुक्या प्राण्याचा जीव गेल्याचे वृत्त अनेकदा वाचलं असेल. असंच काहीस संकट एका मुक्या प्राण्यावर घोंगावत होतं. पण एका मराठी अभिनेत्याच्या सतर्कने त्या मुक्या प्राण्याचा जीव वाचला. ही घटना नुकतीच घडली असून हा प्रसंग त्या अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा अभिनेता म्हणजे बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे. उत्कर्ष नेहमी सोशल मीडियावर खूप सुंदर पोस्ट लिहित असतो. त्याची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. नुकतीच त्याने ‘फायटर’ची गोष्ट शेअर केली; जी चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘फायटर’ म्हणजे एका कुत्र्याचं पिल्लू. जे हायवेवर भडकलं होतं. त्याचं पिल्लाचा उत्कर्षने हायवे उतरून जीव वाचवला. याचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने तो प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: सई ताम्हणकरने ‘अशी’ साजरी केली मकरसंक्रांत, व्हिडीओ आला समोर

अभिनेता उत्कर्ष शिंदेनं लिहिल, “‘फायटर’वर संक्रांत आली होती का? माहिती नाही पण ‘संकट’ नक्कीच आलं होतं…छत्रपती संभाजी नगरमध्ये सामाजिक रित्या माझा वाढदिवस साजरा करून भल्या पहाटे मुंबईसाठी परत निघालो. गरमा गरम हुरडा खात, गार वारा कापत प्रवास सुरू होता. हायवेवर एका मागोमाग भरधाव वेगाने वाहने धावत होती आणि तितक्यात नगर येता येता रस्त्याच्या मधोमध दिसला एक चिमुकला ‘फायटर’. एका पायाने लंगडत हायवेवर त्याच्या आईला शोधत सैरावैरा जीवाच्या आकांताने मधोमध पळणार, घाबरलेलं, वाट विसरलेलं एक चिमुकलं कुत्र्याचं पिल्लू. आमच्या गाडी समोर ‘फायटर’ दिसताच आम्ही कार कशी बशी कंट्रोल करत रस्त्याच्या कडेला थांबवली. खरा काउंटडाऊन सुरू झाला होता तो तेव्हाच. भीती होती ती आता मागून दुसऱ्या कोणत्या तरी गाडी खाली त्याचा जीव जाऊ नये याची. तसाच गाडीतून मी उतरुन उलट हायवेवर धावत रस्त्याच्या मधोमध ‘फायटर’च्या मदतीस पोहोचलो, त्याला उचललं. पाहिलं तर एका पायाला जखम असल्याने तो लंगडत होता. विचार केला याची आई जवळ आसपास असेल. याला इथेच झाडात सोडू म्हणजे हा सुखरुप राहील. पण का जाणे ते पिल्लू केविलवाण्या नजरेनं बघू लागलं.”

“एक क्षण विचार केला आणि पुन्हा त्या पिल्लाला उचललं. गाडीत बरोबर घेऊन आलो. त्याला दुसरं कुठे लागलं नाहीना? चेक करत करत. तो भूकेला असेल, तहान लागली असेल, आधी याला एनर्जी मिळावी म्हणजे हा स्थिर होईल या विचाराने. त्या पिल्ला घेऊन पुढे एका धाब्यावर थांबलो, त्याला पाणी पाजल-बिस्कीट खाऊ घातलं. त्याच्या पायाला औषध लावलं आणि काही काळ आम्ही गुळाचा चहा घेत तिथे थांबलो. तेथील काही चाहत्यांनी सेल्फी घेतले. काहींनी त्या पिल्लाबद्दल विचारपूस केली. मांडीत बसलेला जखमी पिल्लू पाहून तेथील एकाने मी हे पिल्लू घेऊ का? मी त्याचा सांभाळ करतो सर म्हणत मायेने त्याला जवळ घेतलं आणि त्याची पुढील जबाबदारी घेतली. आणि मनात विचार आला. आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी. आजच्या या संकटाला हरवून एका ‘फायटर’सारखा. निरोप घेतला, निघालो पण या घटनेतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो. मी का बरं हे टेन्शन मागे घेऊ? माझं थोडीचं हे काम आहे? मला काय गरज? आपण बऱ्याचदा हे विसरून जातो की आपल्या छोट्याश्या मदतीने कोणावर ओढावणारी वाईट गोष्ट टळू शकते. इट्स अ सर्कल. तुम्ही मदत करा कोणाची तरी तुमची मदत करायला नक्कीच कोणीना कोणी येईलच. आज तिळगुळ देऊन फक्त वरून गोड गोड बोलायचं नाही तर जिथे जाऊ तिथे गोडवा पसरवायचा प्रयत्न करायचा,” असं उत्कर्षनं लिहिल आहे.

हेही वाचा – “अमोल कोल्हे मालिकेत आहेत का?”, ‘शिवा’चा नवा प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न, मालिकेशी काय आहे खासदारांचा संबंध? जाणून घ्या…

दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor utkarsh shinde saved the dog puppy life pps
Show comments