मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून वैभव मांगले यांना ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत त्यांचा चाहतावर्ग आहे. नुकतंच वैभव मांगले यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.
वैभव मांगले हे सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. वैभव मांगले यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “त …..झालं असं” असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : कॅनडा कुमार म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अक्षयला भारतीय नागरिकत्व मिळाले तेव्हा…
या व्हिडीओच्या सुरुवातीला ते हातात ग्लास घेऊन बसले आहेत. यावेळी ते “हडळ आहे हडळ…लक्षात ठेवा तुम्ही आहात म्हणून हा त्रास सहन होतोय”, असे बोलताना दिसत आहेत. त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांची पत्नी ऐकतेय हा मी असे बोलते. त्यापुढे “ऐरवी बियरचा ग्लास असला की परी, व्हिस्कीचा ग्लास हातात असला की अप्सरा आणि आज काय झालंय हडळ म्हणायला…” असा प्रश्नही त्यांच्या पत्नीने विचारला.
त्यावर वैभव मांगलेंनी “आज हातात पाण्याचा ग्लास आहे आणि त्यात लिंबू पाणी आहे. सीधी बात नो बकवास”, असे म्हटले. त्यानंतर त्यांची पत्नी अंगावर पाणी उडवते आणि ते ‘थंडा थंडा कूल कूल’ असे म्हणतात.
आणखी वाचा : Video : न्यूयॉर्कमध्ये अमृता फडणवीसांच्या गाण्यांचा जलवा, परदेशी नागरिकांनी ऐकल्यावर केलं असं काही…
वैभव मांगलेंनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर त्याचे अनेक चाहते हसण्याचे इमोजी कमेंट करताना दिसत आहेत. तर अनेकांनी ‘भारी सर’, ‘भाऊ घरात राहायचं ना’, अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत.