ऐंशी व नव्वदच्या दशकात मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे विजय कदम. ‘टूरटूर’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा अनेक नाटकातून विजय कदम यांनी रंगभूमी गाजवली. याचं रंगभूमीवर केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘इरसाल कार्टी’, ‘दे दणादण’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बाबुराव तांडेल ही भूमिका साकारली होती.
१० ऑक्टोबर २०२४ला विजय कदम यांचं निधन झालं. कर्करोगाशी दुसरी झुंज त्यांची अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या पत्नी देखील अभिनेत्री आहेत. पद्मश्री जोशी असं त्यांचं नावं आहे. अभिनेत्री पद्मश्री जोशींनी काही दिवसांपूर्वी कांचन अधिकारी यांच्या ‘बातों बातों में’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विजय कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा त्यांनी प्रपोजचा किस्सा सांगितला.
हेही वाचा – विजय कदम यांची पत्नी पद्मश्री जोशींबरोबर ‘अशी’ झाली होती पहिली भेट, किस्सा सांगत म्हणाल्या…
पद्मश्री जोशी म्हणाल्या, “‘टूरटूर’ नाटकाच्या दौऱ्यामध्ये त्याने मला एकदा प्रपोज केलं. मी म्हटलं, मला लग्न करायचं नाही. मग काही काळानंतर परत त्याने प्रपोज केलं. मी म्हटलं, आपण चांगले मित्र आहोत ना. मग ती मैत्री संपते. त्यामुळे लग्न नको करूया. त्याच्यानंतर १९८६ साली ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटक आलं. विजय मला म्हटला, शिवाजी मंदिराला प्रयोग आहे. रात्री बघायला ये. मी म्हटलं, ये मी काय तमाशा वगैरे बघायला येणार नाही. त्यावेळेला तमाशाकडे वेगळ्या नजरणेने बघितलं जायचं. त्याने मला सांगितलं तुझ्या डोक्यात जे काही तमाशाबद्दल आहे तसं हे नाहीये. हे लोकनाट्य आहे तू बघायला ये. मी म्हटलं, येईन. रात्रीचा प्रयोग आहे. ११, ११.३० वाजता नाटक संपेल. मला घरी सोडलं पाहिजे. मग म्हणाला, सोडतो ये बघायला. मग मी शिवाजी मंदिराला त्याचं नाटक बघायला गेले. त्यानंतर त्याची पहिल्या अंकातली बतावणी बघितली आणि मी भारावून गेले. त्यानं माझं मनं जिंकलं.”
“मग नाटक संपल्यावर त्याने मला घरी सोडलं. तेव्हा मी त्याला विचारलं, तुझ्या नाटकाचं शीर्षक मी तुला विचारलं तर काय करशील? असं एकदम काव्यात्मक विचारलं. तो खूप महाशहाणा. दोनदा नकार पचवला. म्हणाला, विचार करून सांगतो. एकदम रुबाबात म्हणाला,” असं पद्मश्री जोशी म्हणाल्या.
हेही वाचा – Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
“पुढे ३१ डिसेंबर १९८६ मध्ये आमचं कुटुंब पुण्याला गेलं होतं. मी, पल्लवी, अलंकार, अरुण दातेंचा मुलगा अतुल, रवी दातेंचा मुलगा समीर असे आम्ही सगळेजण गेलो होतो. तिथे विजय पण होता. तेव्हा ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता विजय मला म्हणाला, इथून पुढची सगळी वर्ष आपली. तो भविष्य, ज्योतिष या गोष्टी मानणारा होता. तो मला म्हणाला, मला कोणीतरी सांगितलं होतं. १९८६मध्ये लग्नाचा निर्णय घेऊ नको. आता १२ वाजून गेले ८६ वर्ष संपलं. आता आपण लग्न करूया. याबाबत मी, पल्लवी आणि अलंकाराला सांगितलं,” असं पद्मश्री जोशी म्हणाल्या.