गेल्या चार दशकांपासून अशोक सराफ छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपले आजी-आजोबा, आई-वडील जितके आवडीने अशोक सराफ यांचे चित्रपट पाहतात, तितक्याच आवडीने आजची पिढीही त्यांचे चित्रपट पाहतात. अलीकडेच महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित शुभेच्छांचा वर्षाव केला.

नुकतेच अशोक सराफ एका वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांना त्यांच्या आवडी-निवडीविषयी विचारण्यात आलं. सुरुवातीला त्यांना एखाद्या आवडत्या पदार्थाविषयी विचारलं. त्यावर अशोक सराफ म्हणाले, “एक नाही मला सगळेच पदार्थ आवडतात.”

पुढे अशोक सराफ यांना आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहे? असं विचारलं. तेव्हा अशोक मामा म्हणाले, “आवडता अभिनेता अर्थात मीच आहे. आवडती अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ हिचं नाव घ्यायला पाहिजे. नाहीतर माझी घरी जेवायची पंचायत होईल.” नंतर आवडता चित्रपट कोणता असं विचारलं. यावर अशोक सराफ म्हणाले, बरेच आहेत. तसंच अशोक यांचा आवडता छंद सतत काम करणं आहे.

अशोक सराफ खूप वर्षांनी मालिका करत असल्यामुळे म्हणाले, “वेगळं असं काही वाटतं नाही. अभिनय हा सारखाच असतो. मजा येतेय. पहिल्यादांच मी मालिका करतोय. पण, माझी पंचायत होतं आहे. चित्रपटांचं शूटिंग करणं थांबवलं आहे.”

दरम्यान, अशोक सराफ यांची ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘अशोक मा.मा’ मालिका सुरू आहे. या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह ‘अशोक मा.मा’ मालिकेत शुभवी गुप्ते, रसिका वखरकर, नेहा शितोळे असे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.

Story img Loader