अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि उत्कृष्ट डान्सर म्हणून ओळखला जाणारा पुष्कर जोग नेहमी चर्चेत असतो. पुष्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी आपली परखड मत मांडताना दिसतो. बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्ताने पुष्करने एक खास पोस्ट शेअर केली होती. ज्यावर एका युजरने आक्षेप घेतला. पण, या युजरला पुष्करने चांगलं सुनावलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुष्कर जोगने फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबरोबर फोटो शेअर करत लिहिलं की, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फरहान अख्तर, हे तुझ्यासाठी…नक्की वाच…जेव्हा १०-१२ वर्षांपूर्वी मी करिअरच्या उरत्या टप्प्यात होतो. तेव्हाचे माझ्या बाबांचं निधन झालं आणि चित्रपटाची निर्मिती करताना मला फसवलं गेलं. यामुळे मी खूप खचलो होतो. मी आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना इंडस्ट्रीने माझ्याबद्दल लिहिणं बंद केलं. त्यानंतर मी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट पाहिला. या चित्रपटातील तुझ्या अभिनयाने मी भारावून गेलो. हा चित्रपट अजूनही सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. मी हा चित्रपट कुठेही पाहू शकतो.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

“एका सीनमध्ये तू जखमी झालेल्या पायाने धावतोस ते माझ्यासाठी प्रेरणा देणारं होतं. तू माझ्यासह अनेकांना खरोखरच प्रेरणा दिली. मी काही वर्षांनी पुनरागमन केलं आणि तेव्हापासून कधी मागे वळून पाहिलं नाही. मला प्रेरणा दिल्याबद्दल तुझे ऋणी आहे. ईश्वराचे नेहमी तुझ्यावर आशीर्वाद राहो. लवकरच भेटू,” असं पुष्करने लिहिलं होतं.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा

पुष्करच्या या पोस्टवर एक युजर म्हणाली, “या फालतू लोकांना काय भाव देतोय? तुला असं वाटतंय का यांचं कौतुक केल्यावर तुला बॉलीवूडमध्ये काम मिळेल.” त्यावर पुष्कर म्हणाला की, हाहा…मी जर XXX असतो ना आज खूप मोठा झालो असतो. जस्ट चील…मला जे वाटलं ते मी व्यक्त झालो. जे माझ्या मनात आहे, तेच माझ्या तोंडावर आहे. त्यानंतर ती युजर म्हणाली, “हाच नाही. तर तू अनेक बॉलीवूड कलाकारांबरोबर फोटो पोस्ट करत असतोस आणि असं दाखवतोस की, बॉलीवूडवाल्यांबरोबर माझी किती ओळख आहे बघा.”

हेही वाचा – “फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

मग पुष्कर जोग म्हणाला, “हो ओळख आहे. मग पुढे काय? तुला काही समस्या आहे का? तुला अटेंशन हवंय का?” त्यावर युजर म्हणाली की, तुम्ही काय मला अटेंशन देणार…हे असे उद्योग करून अटेंशन तर आपल्याला पाहिजे. पुढे पुष्कर म्हणाला, “तुझा आत्मा नाराज झालाय…ईश्वराचे तुझ्यावर आशीर्वाद राहो.” त्यावर त्या युजरने प्रतिक्रिया दिली की, तुलाही. मग पुष्कर म्हणाला, “धन्यवाद, तू मला आशीर्वाद देणार हे मला माहीत होतं.” तेव्हा ती युजर म्हणाली, “नाराज झालेल्या आत्म्यासाठी नाही म्हणाले.” यावर पुष्कर म्हणाला, “ताई, आता १२.५७ वाजलेत. आता झोप…डाटा संपले नाहीतर.” ती युजर म्हणाली, “डाटा अनलिमिटेड आहे…व्हायफाय आहे.” नंतर पुष्कर म्हणाला की, तुझ्या डोक्यातला डाटा मला म्हणायचं होतं…चल आता झोप. मग ती युजर ओके शुभ रात्री म्हणाली.

Comments

दरम्यान, पुष्कर जोगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नुकतंच त्याचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘बायडी’ असं त्याच्या नव्या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात पुष्करबरोबर अभिनेत्री पूजा राठोड पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरने हे गाणं गायलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actors pushkar jog answer to troller pps