केंद्र सरकारकडून ३ ऑक्टोबरला एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. सहा दशकांनंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्य झाली. मराठीसह पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या भाषांदेखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल झाल्यानिमित्ताने मराठी कलाकार आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पारितोषिक विजेते लोकप्रिय संगीतकार सलील कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानिमित्ताने आनंद व्यक्त केला आहे. सलील कुलकर्णी म्हणाले, “मित्रांनो अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ज्या भाषेत आपण स्वप्न पाहतो, ज्या भाषेमध्ये आपण वेदना व्यक्त करतो, ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण ही माझ्यासाठी, सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळे आपल्या भाषेची पोरं आहोत.”

हेही वाचा – “आमच्या हास्यजत्रेवाले हलकट लोक…”, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला? वाचा…

पुढे सलील कुलकर्णी म्हणाले, “लहानपणापासून आपण ज्या भाषेचा चष्मा लावून जगाकडे बघितलं, ती भाषा जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळवते तेव्हा आपल्या सगळ्यांना मनापासून समाधान वाटतं. गेली २७, २८ वर्ष मराठी कविता, मराठी गाणी गाण्याचा जो आनंद मिळाला. तर आज हा आनंद द्विगुणित झाला आहे आणि यानिमित्ताने ज्या, ज्या ज्येष्ठ मंडळींनी आपली मराठी भाषा जपली, वेचली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली. त्या सगळ्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत. कारण त्या सगळ्यांमुळे मराठी भाषा आपल्या पिढीपर्यंत पोहोचली. त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि भाषेला नमस्कार करतो. ज्यांनी, ज्यांनी प्रयत्न करून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार,”

अभिनेता सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर सुबोधने लिहिलं आहे, “अभिजात भाषा, मराठी भाषा! केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले त्या प्रत्येकाला मनापासून वंदन.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन; निक्की, अभिजीतला म्हणाला…

सुबोध भावे पोस्ट

तसंच लोकप्रिय लेखक क्षितिज पटवर्धनच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिलं आहे, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल…आता आपली मराठी बोलण्याची, वाचण्याची, पाहण्याची, जपण्याची जबाबदारी वाढलीय….फक्त उत्सव नाही, जगण्यात मराठी आणूया…फक्त प्रमाण नाही, बोलीत मराठी सजवूया…फक्त जुनं नाही, नवीन कला, साहित्य घडवूया…फक्त जपणूक नाही, मराठी चौफेर वाढवूया…”

याशिवाय, “आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. खूप आनंद होतोय. मायमराठी,” अशी पोस्ट संदीप पाठकने लिहिली आहे. तसंच अभिनेता जयेश जाधव, अंकुर वाढवे, राजेश देशपांडे, सोनाली कुलकर्णी, मेघा धाडे, अशा अनेक कलाकारांनी आपला आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actors reaction on union cabinet on approved granting classical language status to marathi pps