अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हटलं जातं. आजवर त्याने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यामधून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो, मजेशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण यामध्ये तो भडकलेला दिसत आहे.
“सगळ्यांचं होतं का माहीत नाही, मला तर लय राग येतो,” असं कॅप्शन लिहित सिद्धार्थ चांदेकरने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ म्हणतोय, “तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माइलीला थोबाडीत मारावीशी वाटली? म्हणजे बघाना, आपल्याला कोणीतरी एक कमाल रील पाठवतं. आपल्या खूप हसू येतं म्हणून आपण उत्साहात बरेच स्माइलीचे इमोजी पाठवतो. पण यावेळी एक स्माइली खालच्या रांगेत गेलेला असतो. आता तुला काय झालं होतं वर त्यांच्याबरोबर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत?” असा मजेशीर व्हिडीओ सिद्धार्थने शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
सिद्धार्थच्या या व्हिडीओवर कलाकारांसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर सिद्धार्थची बायको, अभिनेत्री मिताली मयेकरने लिहिलं आहे, “ओसीडी प्रो मॅक्स.” तसंच मृण्मयी देशपांडे लिहिलं आहे, “खरंच? तुला आता हे वाटतंय?” तर पूजा पुरंदरेने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
हेही वाचा – “शरद पोंक्षेसारखं धैर्य खूप कमी लोक दाखवतात”, संजय मोनेंचे विधान; म्हणाले, “छोटी-मोठी काम करत…”
याशिवाय एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “कुणाचं काय आणि कुणाचं काय?” दुसऱ्या नेटकरीने लिहिलं, “मला ही राग येतो. मग मी अनसेन्ड करते आणि परत एक स्माइली कमी करते. मग परत पाठवते.”