उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थाने फक्त मराठीतच नाही तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – आता ‘या’मध्येही मारली ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी; ‘प्रेमाची गोष्ट’ला…
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर ‘मन धागा धागा जोडते नवा’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला त्याचं औक्षण केलं आणि त्यानंतर केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सिद्धार्थचा संघर्षमय प्रवास ऐकून कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – ‘या’ गोड चिमुकलीला ओळखलंत का? रातोरात झाली होती सुपरस्टार
सिद्धार्थ म्हणाला, “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. माझ्या आयुष्यातले हे टप्पे मी खूप एन्जॉय करतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. धडपडत गेलो, पडत गेलो पण उभा राहिलो. आनंद वाटण्याने आनंद मिळतो ही जी गोष्ट आहे, ती खूप महत्त्वाची आहे. मी नेहमीच म्हणतो, मी किती चांगला अभिनेता आहे, हे मला माहित नाही. पण मी प्रचंड नशीबवान अभिनेता आहे की मला त्या क्षणाला त्या लोकांचा सहवास मिळतो आणि माझं आयुष्य समृद्ध होतं. धन्यवाद. माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. गेल्यावर्षी माझ्यासाठी महेश मांजरेकर केक घेऊन आले होते. माझे बाबा, दादा आणि आई आली होती. माहित नाही माझं नशीब काय आहे? पण आता माझ्याबरोबर केक कापताना स्वरा आहे.”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ
हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…
दरम्यान, सिद्धार्थ जाधवने २००४ साली केदार शिंदे यांच्या ‘अग्गंबाई अरेच्चा’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘साडे माडे तीन’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘टाइम प्लीज’, ‘दे धक्का’, ‘यांचा काही नेम नाही’ यांसारख्या चित्रपटात झळकला. त्यानंतर सिद्धार्थने ‘गोलमान फन अनलिमिटेड’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. मग तो ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘पावडर’, ‘गौर हरी दास्तान’, ‘सिम्बा’, ‘राधे’, ‘सुर्यवंशी’, ‘सर्कस’ यांसारख्या अनेक चित्रपटात पाहायला मिळाला.