ऐश्वर्या नारकर, सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या मराठी अभिनेत्री. इतर मराठमोळ्या अभिनेत्रींप्रमाणे ऐश्वर्या नारकर देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यावरील त्यांचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. शिवाय त्या योगाचे व्हिडीओ देखील शेअर करत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दोघांचे व्हिडीओ काही नेटकऱ्यांना खटकत असून त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया करून ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांवर टीका करत आहेत.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा चिमुकला लेक लाटतोय पोळ्या; पाहा व्हिडीओ

नुकताच दोघांच्या पेजवर एका व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, ऐश्वर्या आणि अविनाश यांचे काही फोटो पाहायला मिळत आहेत. याच व्हिडीओवरील एका नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

या व्हिडीओवरील प्रतिक्रियेत एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, अतिहुशार जोडपं…म्हणूनच सिनेसृष्टीमधून बाहेर झालं. या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी हा नेटकऱ्याला टॅग करत लिहीलं, “कोण म्हणतंय असं? घरी या एकदा…काय कमवलंय ते दाखवतो…थोडा स्मार्टनेस कमवा…कसा आदर ठेवावा इतकी तरी अक्कल येऊ दे तुम्हाला हीच प्रार्थना देवाकडे…”

हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश नारकर सध्या ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. शिवाय त्या ‘स्टार प्लस’वरील हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत.