‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली शिवाली परब आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. कधी चित्रपटात, तर कधी अल्बम साँगमध्ये शिवाली दिसत आहे. काही आठवड्यांआधी तिचा ‘पाणीपुरी’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात शिवालीसह मकरंद देशपांडे, विशाखा सुभेदार, कैलाश वाघमारे अशी तगडी कलाकार मंडळी होती. त्यानंतर आता शिवाली एका वेगळ्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटात शिवाली परब चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मंगलाच्या भूमिकेत झळकणार आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलसह शशांक शेंडे यांनी शिवालीच्या कामाचं भरभरून कौतुक केलं.

priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मृणालने ठाकूरनं 'पाणी' सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/ Instagram)
मृणाल ठाकूरनं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं केलं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही…”
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”
Raveena Tondon And Govinda
“…तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते”, गोविंदा व रवीना टंडनबाबत सुनिता आहुजा म्हणाल्या, “मी तिला सांगितले…”
Manisha Kelkar Success Story
मराठी अभिनेत्रीची यशोगाथा! जागतिक पातळीवर करतेय देशाचं प्रतिनिधित्व, ‘कार रेसर’ म्हणून मिळवली ओळख, जाणून घ्या…

हेही वाचा – ‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”

अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या, “आमच्या शिवालीचं मनापासून कौतुक करावंस वाटतं. बऱ्याच नायिका मी किती सुंदर दिसते, मी मेकअपमध्ये किती छान दिसते, हे बघत असतात. अशावेळी शिवालीचा चित्रपटामध्ये ९० टक्के असा मेकअप होता. त्या मुलीने तो केला आणि ती १२-१२ तास मेकअपमध्ये असायची. त्यामुळे मी शिवालीचं मनापासून अभिनंदन करते.”

हेही वाचा – “आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

तसंच अभिनेते शशांक शेंडे म्हणाले की, ज्या वयात नटूथटून कॅमेरासमोर ती दिसते आहे. अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच कठीण आहे. मला तिचं मनापासून कौतुक आहे.

हेही वाचा – दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

दरम्यान, शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर काम लीलया सांभाळत आहे. आता ती मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवणार आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहे. २१ डिसेंबरपासून हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.

Story img Loader