९०च्या दशकात मराठी सिनेसृष्टीतील नायिकाप्रधान चित्रपटांचं पर्व गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये. मराठी रसिक प्रेक्षक अलका कुबल यांच्यात आपली मुलगी, सून, ताई, आई हे नातं पाहत आले आहेत. अजूनही त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी अलका यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्या मोठी लेक, पायलट ईशानीबरोबर पाहायला मिळाल्या होत्या. अलका कुबल यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पण, या फोटोमागची गोष्ट तुम्हाला माहितीये का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी अलका कुबल यांनी ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना पायलट ईशानीबरोबर व्हायरल झालेल्या फोटोमागची गोष्ट विचारलं. तेव्हा त्या हा निव्वळ योगायोग असल्याचं म्हणाल्या.

हेही वाचा – शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

अलका कुबल म्हणाल्या की, खरंतर योगायोग आहे. मी नागपूरच्या एका कॉलेजच्या कार्यक्रमाला चालले होते. तिलाही माहीत नव्हतं, माझ्या विमानाचं तिकिट आधीचं आलं होतं. रात्री आम्ही असेच गप्पा मारत होतो. ती म्हणाली, मला उद्या नागपूर फ्लाइट आहे. मग मी पण म्हणाली, मलाही उद्या नागपूरचा कार्यक्रम आहे. तर समीर म्हणाला की, नागपूर! मी म्हणाले, मी सकाळच्या इंडिगोच्या फ्लाइटने चालली आहे. मग तीही म्हणाली, मी पण त्याच फाइटने चालली आहे.

हेही वाचा – रिचा चड्ढा-अली फैजल चिमुकल्या लेकीशी ‘असा’ साधतात संवाद, तिच्यासाठी गातात ‘हे’ गाणं

पुढे अलका कुबल म्हणाल्या, “हा निव्वळ योगायोग होता. मी तिच्या कॅबने पहिल्यांदा विमानतळावर गेले आणि तिला पाहिलं तर खूप आनंद झाला. पण, आम्हाला त्यांच्या कॉकपिटमध्ये जायला परवानगी नाहीये. त्यांचे तसे नियम, कायदे आहेत. जेव्हा विमान थांबलं, आम्ही लँड झालो. त्यानंतर सगळे प्रवासी उतरले, मग आम्ही तो फोटो काढला. कारण तिच्या नोकरीत जे काही नियम असतात ते पाळावे लागतात. पण खूप आनंद आणि अभिमानास्पद वाटतं होतं.”

हेही वाचा – Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…”

दरम्यान, सध्या अलका कुबल ‘मंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अपर्णा होशिंग दिग्दर्शित ‘मंगला’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मंगला’ चित्रपटात अलका कुबल यांच्यासह अभिनेत्री शिवाली परब, शशांक शेंडे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress alka kubal said about behind story of these photos pps