गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. जुलै महिन्यात त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर १८ नोव्हेंबरला दोघांचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अमृता आणि प्रसादच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित राहिले होते. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच अमृताने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामधून तिने प्रसादकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. अमृताची ही इच्छा काय आहे? जाणून घ्या…

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे सूर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात जुळले. या पर्वात दोघांची चांगलीच मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि अखेर दोघं लग्नबंधनात अडकले. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्न अमृता आणि प्रसादचं झालं. अभिनेत्रीने लग्नातील काही खास फोटो शेअर करत प्रसादकडे एक इच्छा व्यक्त केली आहे.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

हेही वाचा – भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहून ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींनी टीव्ही केला बंद; म्हणाल्या…

अमृताने लग्नातले तीन खास फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अमृता आणि प्रसाद नाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघं एकमेकांमध्ये गुंतलेले पाहायला मिळत आहे. तसेच तिसऱ्या फोटोमध्ये दोघांची छान केमिस्ट्री दिसत आहे. हे फोटो शेअर करत अमृताने लिहीलं आहे की, “माझी एक इच्छा आहे, मला तू नेहमी परिपूर्ण हवा आहेस. फक्त तू आणि मी दररोज…”

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शाहरुख खानच्या कृतीने वेधलं लक्ष, आशा भोसलेंच्या हातात कप पाहिला अन्…

हेही वाचा – अमृता देशमुखच्या वहिनीने दिल्या खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली, “अभी तो…”

दरम्यान, अमृता प्रसादच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अमृता पुण्याची ‘टॉकरवडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर तिने रेडिओ जॉकी म्हणून प्रवास सुरू केला. याशिवाय प्रसाद जवादेने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असून शेवटचा तो ‘काव्यांजली’ मालिकेत झळकला होता.

Story img Loader