मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. अमृता खानविलकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. नुकतंच अमृता खानविलकरने अभिनेत्री जिनिलीया देशमुखबरोबर एक रील केला आहे. या रीलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अमृता खानविलकरने नुकतंच इन्स्टाग्राम एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमृता खानविलकर अभिनेत्री जिनिलिया देशमुखबरोबर रील करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अमृता खानविलकर ही जिनिलियाला हॅलो करत आहे.
आणखी वाचा : Video : “राज ठाकरे की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र जास्त समर्थपणे कोण सांभाळू शकतं?” उर्मिला मातोंडकर म्हणतात…
त्यानंतर अमृताही जिनिलियाला “तुला कुठे तरी पाहायला सारखं वाटतंय”, असं म्हणते. त्यावर जिनिलिया ही हसत हसत “तुम्हाला मी ओळखत नाही” असं अमृताला सांगते. त्यावेळी अमृता तिला म्हणते “अरे, तू मला विसरलीस, मी तुझ्या शेजारी राहायचे, माझ्या घरी मोठमोठे सेलिब्रेटी यायचे.” त्यावर जिनिलिया ही हा हा असं म्हणते आणि “मला काहीही आठवत नाही”, असे निरागस पद्धतीने तिला सांगते.
आणखी वाचा : “…आणि आज दिपा स्टार आहे”, केदार शिंदेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले “अंकुश चौधरी…”
दरम्यान अमृता खानविलकरने हा व्हिडीओ शेअर करताना हटके कॅप्शन दिले आहे. “मला फक्त हे करुन पाहायचे होतं, जिनिलियाला खूप खूप प्रेम आणि तिच्या रिल्सलाही”, असे कॅप्शन अमृता खानविलकरने दिले आहे. सध्या अमृताचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.