सध्या सर्वत्र बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू आहे. सार्वजनिक मंडळांकडून गैरप्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. अशातच अंधेरीतील एका सार्वजनिक गणेश मंडळाकडून ड्रेसकोड जारी करण्यात आला आहे. हाफ जीन्स, स्कर्ट घालून गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मनाई करण्यात आली आहे. या ड्रेसकोडला काहीजण विरोध करत आहेत, तर काहीजण पाठिंबा देत आहेत. अभिनेत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्या दीपाली सय्यद यांनी या ड्रेसकोडवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप लवकरच ‘या’ चित्रपटात झळकणार; प्रथमेश परब असणार जोडीला

What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Govind Bagh, Baramati, Sharad Pawar,
बारामतीत गोविंदबागेत इच्छुकांची भाऊगर्दी, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून शरद पवार यांंची भेट
Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, “मला असा वाटतंय की, आपणच आपल्या देवांचा मान ठेवला नाही, तर मग दुसरे काय ठेवणार? त्यामुळे या ज्या गोष्टी होत आहेत त्या बरोबर आहेत. प्रत्येकाने त्या गोष्टीच पालन करणं गरजेचं आहे. मी तर या गोष्टीला दुजारा देते. कारण अशा गोष्टी एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या पाहिजे.”

हेही वाचा – Video: अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले, “दादा एक…”

पुढे दीपाली म्हणाल्या की, “जे लोक याला विरोध करत आहेत त्यांना मी विचारते की, यात काय विरोध करण्यासारखं आहे? उलट हे चांगलंच आहे ना? आपण आपल्या देवाकडे काय नजरेने बघतो, कशासाठी जातो. आपल्या धर्माचा आपणच आदर करणार नाही तर दुसरे काय करणार. त्याच्यात चुकीचं काय आहे? तुम्ही फुल जीन्स घालू शकताय. हाफ जीन्स घालायची गरज नाही. ते घालून जाण्यासाठी तुम्हाला दुसरे कार्यक्रम असतात की तेव्हा घाला. साडी आहे, सलवार कमीज आहे सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या हिंदुस्थानात खूप छान पेहराव करण्यासाठी गोष्टी आहेत. ती जागा हाफ चड्डीची नाही. त्यामुळे जे विरोध करतायत त्यांचा मी विरोध करते.”