मराठी सिनेसृष्टीतील ‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत हिचा आज वाढदिवस. पूजाचं नाव जरी घेतलं तरी सर्वात आधी डोळ्यासमोर येतं तिचं नृत्य. ती जितक्या सहजतेनं एखादं नृत्य करते, ते सादरीकरण सतत पाहत राहावसं वाटतं. तिचा अभिनय देखील तितकाच सहजसुंदर असतो. पूजाच्या अभिनयात तोचतोच पणा कधी जाणवतं नाही. त्यामुळेच ‘क्षणभर विश्रांती’पासून ते आजवर करत आलेल्या प्रत्येक चित्रपटातील तिची भूमिका ठळकपणे लक्षात राहते. मग ती ‘निळंकठ मास्तर’मधली इंदू असो, ‘दगडी चाळ’मधील सोनल असो किंवा ‘लपाछपी’ चित्रपटातील नेहा. तिच्या प्रत्येक चित्रपटाच्या भूमिका कायम लक्षात राहण्यासारख्या आहेत. जरी तिच्या काही चित्रपटांना तितकस यश मिळालं नसलं तरी तिने साकारलेल्या भूमिका उत्कृष्ट आहेत. पूजाच्या अभिनयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली होती. ‘एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘लपाछपी’ या चित्रपटासाठी पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.

पूजाला हे अभिनयाचं बाळकडू तिच्या वडिलांकडून मिळालं. पूजाचे वडील विलास सावंत हे अभिनय क्षेत्रात ३० वर्षे सक्रिय होते. त्यांनी अनेक नाटकं केली. सध्या ते ‘जगदंब क्रिएशन्स’ या प्रोडक्शन हाउसची जबाबदारी पार पाडतं आहेत. खरंतर पूजाला वडिलांकडून अभिनयाबरोबर प्राणीप्रेमीचं बाळकडू देखील मिळालं. त्यामुळे पूजाला अभिनेत्री नव्हे तर प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. पण अपघाताने पूजा ही अभिनय क्षेत्राकडे वळाली. ‘श्रावण क्विन’ या स्पर्धेनंतर पूजाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिची दुसरी बाजू पाहणार आहोत. ती म्हणजे प्राणीप्रेमी पूजा. काही महिन्यांपूर्वी पूजाने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये प्राण्यांबद्दल अनेक किस्से सांगितले होते.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vandana Gupte
गणेशोत्सवात अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रेक्षकांसाठी खास भेट; ‘पार्वती नंदना’ अल्बम प्रदर्शित होताच म्हणाल्या, “आपल्या नातवाला…”
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
gashmeer mahajani as Vyakantadhwari Narasimha Shastri
प्राजक्ता माळीच्या सिनेमातील नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील ‘या’ मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?
actress delnaaz irani boyfriend percy
१४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री, पतीनेही केलंय दुसरं लग्न
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!

पूजा सावंत शिक्षण प्राणीशास्त्रातून (Zoology) झालं आहे. आज जरी प्राण्यांची डॉक्टर नसली, तरी ती बऱ्याचदा जखमी, कुठेही अडकलेले प्राणी किंवा पक्ष्यांना सोडवून त्यांना जीवनदान देत असते. नेहमी तिच्या गाडीमध्ये प्राण्यांचं खाणं व औषध घेऊन ती फिरत असते. तिला अनेकांचे प्राण्यांचा बचाव करण्यासाठी, त्यांची औषध विचारण्यासाठी फोन येत असतात. तिच्याकडे पाळीव प्राण्यांसह पक्षी देखील आहेत. पूजाकडे ‘पिकबू’ नावाचा एक पक्षी आहे, ज्याचा बचाव अभिनेत्रीने स्वतः केला होता. एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला पूजा कुटुंबांबरोबर गेली होती. तेव्हा तिला त्यांच्या माळ्यावर पक्ष्यांचा आवाज आला. तिने माळ्यावर चढून पाहिलं तर एका पिंजऱ्यामध्ये भरपूर लव्हबर्डस् होते आणि प्रत्येकांचा चेहऱ्याला रक्त लागलं होतं. हे पाहून अभिनेत्रीला काही कळेना. त्यामुळे पूजाने पिंजऱ्यात नीट पाहिलं, तर तीन पक्ष्यांची पिल्लं होती. ज्यातले दोन मेले होते आणि तिसरं जे होतं; त्याला प्रत्येक पिंजऱ्यातला पक्षी डोक्यावर जाऊन मारत होतं. त्यामुळे पूजाने त्या पिल्लाला सुखरुप बाहेर काढलं. यावेळेस काहीजण तिला ओरडले. कशासाठी आलीये? काय करतेय? पण पूजाने त्याकडे लक्ष न देता ते पिल्लू काढलं. वडिलांपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र घरी परताना गाडीत बसल्यानंतर वडिलांना पिल्लाची गोष्ट कळाली. शेवटी त्या पिल्लाला घरी आणलं. पूजाने आणि तिच्या बहिणीने त्या पिल्लावर औषधोपचार केले. हळूहळू जेवण भरवायला सुरुवात केली. काही काळाने ते पिल्लू पूर्णपणे बरं झालं. आता हे पिल्लू मोठं झालं असून पूजाने त्याचं नाव ‘पिकबू’ असं ठेवलं आहे.

हेही वाचा – ‘पांडू हवालदार’पूर्वी अशोक सराफ यांनी का घेतला होता चार वर्षांचा ब्रेक? जाणून घ्या…

पूजाने एका घुबडाचा देखील बचाव केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. हे घुबड एका पाण्याच्या डाकीत पडलं होतं. त्यामुळे पूजाला त्याला वाचवण्यासाठी फोन आला होता. पूजा त्याला वाचवायला जाईपर्यंत तिथल्या वॉचमनने ती पाणीची डाकी उलटी केली. त्यामुळे ते घुबडं बाहेर आलं आणि तडफडत गटाराच्या खाली गेलं. तितक्यात पूजा तिथे पोहोचली. ती त्या गटारात गेली आणि तिने त्या घुबडाला बाहेर काढलं. मग अभिनेत्री त्या घुबडाला घेऊन घरी आली. त्याच्यावरही औषधोपचार केले. त्याला व्यवस्थित खायला दिलं. दोन दिवसांनी ते घुबडं पूर्णपणे बरं झालं. त्यानंतर पूजाने ते फिल्मी सिटीमध्ये जाऊन सोडून दिलं. अशा या प्राणीप्रेमी पूजावर मात्र एका खारुताईनं चार वर्ष डुग धरला होता. कधी तिला चावली तर कधी तिच्या कपड्यांच्या चिंद्या केल्या.

या खारुताईचं नाव ‘रिओ’ होतं, जी मेल होती. एकेदिवशी एका फिमेल खारुताईला चालता येत नव्हतं म्हणून पूजाच्या बहिणीने त्या खारुताईला घरी आणलं होतं. तिच्यावर उपचार केल्यानंतर ती मस्त झाली होती. त्यानंतर तिला सोडायची वेळ आली होती. त्यामुळे पूजाची बहीण त्या खारुताईला सगळ्यांपासून दूर ठेवतं होती. एकेदिवशी पूजाची बहीण कॉलेजला निघून गेली. त्या दिवशी ती खारुताई खूप घाबरली आणि आवाज काढतं होती. तेव्हा ती पलंगाच्या खाली गेली. त्यामुळे पूजा ती खारुताई कुठेही अडकू नये या हेतून तिला वाचवण्यासाठी गेली. अभिनेत्रीने खारुताईला अलदपणे हातात पडकलं. तेव्हाचं नेमकं खारुताईने तो घाबरण्याचा आवाज पुन्हा काढला. हे ऐकून पूजाच्या घरी पाळलेला रिओ धावत आला. त्याला वाटलं, त्या खारुताईवर कोणीतरी हल्ला केला. त्याकाळात त्या दोघांचं खूप चांगलं जमलं होतं. त्यामुळे त्या खारुताईचा आवाज ऐकून आलेला रिओ पूजाचा हातावर जोरात चावला आणि दुसरी खारुताई हातच्या आतल्या बाजूला चावली. पूजाच्या हातातून रक्त वाहू लागलं.

हेही वाचा – मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पूजाच्या बहिणीने त्या फिमेल खारुताईला सोडून दिलं. त्यामुळे रिओला ती दिसेना. म्हणून रिओला वाटलं की, त्या खारुताईचं पूजाने काहीतरी केलं. त्यामुळे रिओ चार वर्ष पूजावर डूग धरून होता. जेव्हा पूजा रिओला जवळ करण्यासाठी प्रयत्न करायची, तेव्हा तो तिला चावायचा. चार वर्ष त्याने पूजाला तिच्या बहिणीच्या रुममध्ये प्रवेश दिला नव्हता. जर पूजाचे कपडे तिच्या बहिणीच्या रुममध्ये गेले तरी रिओ त्या कपड्यांच्या चिंद्या करायचा. पूजाच्या घरी असलेल्या ‘रिओ’ नावाच्या खारुताईचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. दरम्यान, अशा या ‘कलरफूल’ प्राणीप्रेमी पूजा सावंतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.