लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला पछाडलेला चित्रपट चांगलाच गाजला. कलाकारांच्या अभिनयाने संपन्न असलेला हा चित्रपट मराठी कलाविश्वात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील प्रत्येक कलाकार सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. या चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा या पात्राला विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने मनिषाची भूमिका साकारली होती. ती सिनेसृष्टीतून गायब झाली असली तरी सोशल मीडियावर मात्र कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने बांगड्या, टिकली आणि वेस्टर्न कपड्यांबद्दल भाष्य केले आहे.

अश्विनी कुलकर्णी हिने इन्स्टाग्रामवर नुकतंच पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने वेस्टर्न कपड्यांवर बांगड्या घालून चार-पाच फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने ट्रोल करणाऱ्यांना टोलाही लगावला आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

अश्विनी कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट

“तू डेनिम वर बांगड्या काय घातल्या आहेत??”
असा प्रश्न मला नवरात्री च्या 9 दिवसात सतत विचारला जातो!!
का??
डेनिम मला सुटसुटीत वाटते, दिवस भर काम करताना , गाडी चालवताना etc बरी पडते..
बांगड्या मला आवडतात! सणवार, कार्य असताना आवर्जून घातल्या जातात..
पण नवरात्री च्या निमित्ताने सलग 9 दिवस त्या हातात ठेवाव्या असा प्रयत्न मी करते
आणि माझी डेनिम किंवा माझ्या बंगड्या एक मेकिंवर objection पण घेत नाहीत
फार वर्षांपूर्वी मी हैदराबाद मध्ये एका फिल्मी पार्टी ला गेले असताना “एकाने” कौतुकाने आणि आठवणीने माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला..
(हैदराबदमधील गजरे आणि बांगड्या हा एक स्वतंत्र विषय आहे )
मी मिनी स्कर्ट मध्ये होते..
पण देणाऱ्या च्या भावना, आणि मोगऱ्याच्या सौंदर्याचा मान ठेऊन मी लगेचच तो केसांत माळला..
आणि खरं सांगते तिथे अनेक नजरा माझ्याकडे कौतुकाने बघू लागल्या..
दक्षिण भारतात वेस्टर्न आऊटफिटवर टिकली, पैंजण, बांगड्या, गजरे सर्रास वापरल्या जातात..
उत्तरेत मध्ये पण मोठे लाल चुडे , बोटभर जाडीच सिन्दुर, आणि डेनिम अशी सरमिसळ खूप बघायला मिळते.
आपण मात्र डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे “गावंढळ”
बांगड्या घातल्या म्हणजे काकू बाई..
अशी समजूत करून घेतली आहे..
वावरायला सोपे कपडे परिधान नक्कीच करावेत..
पण त्या बरोबर आपल्या संस्कृती प्रमाणे बांगड्या घातल्या तर बिघडलं कुठे??
आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नका घालू..
पण ज्यांना आवडतं त्यांनी कोणाचीही पर्वा न करता खुशाल घाला…
(हवं ते घालणाऱ्या उर्फी जावेद आणि तत्सम influencers , पेक्षा हे इंडो-वेस्टर्न combination फारच सुसह्य आहे नाही का?)
साधारण 2758 बायकांनी मला माझ्या डेनिम आणि बांगड्या बद्दल विचारलं त्या सर्वांसाठी हे सोशल मीडियावरून “स्पष्टीकरण”!!
बांगड्या, पैंजण, टिकली, गजरा कधीही कुठेही कशावरही परिधान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..
आणि तो मी बजावणारच, वि. सु.
वरील प्रकट केलेलं मत हे माझं वैयक्तिक आहे
त्या मागे कोणताही #बांगड्या किंवा #गजरा अशा चळवळी सुरू करण्याचा उद्देश अजीबातच नाही असे अश्विनी कुलकर्णी म्हणाली.

आणखी वाचा : “तिथे रात्री ३ वाजता…” रितेश देशमुखचा शाहरुख खानच्या ‘मन्नत’वरील पार्टीबद्दल खुलासा

दरम्यान अश्विनी कुलकर्णीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचे कौतुक केले आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. विचार स्पष्ट मांडले, यामुळे कसले गैरसमज होणार नाही.. आणि फोटोंमध्ये बांगड्या अजिबात विचित्र वाटत नाहीत, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Story img Loader