लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला पछाडलेला चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकार सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. या चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा या पात्राला विशेष पसंती मिळाली होती. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने या चित्रपटात मनिषाची भूमिका साकारली होती. अश्विनी कुलकर्णीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अश्विनी कुलकर्णी ती सिनेसृष्टीतून गायब झाली असली तरी सोशल मीडियावर मात्र कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने रुग्णालयातील काही फोटो पोस्ट केले आहे. यात तिच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने नेमकं काय झालं? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “डेनिमवर बांगड्या घातल्या म्हणजे…” ‘पछाडलेला’ चित्रपटातील अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
अश्विनी कुलकर्णीची पोस्ट
गेले काही दिवस पुण्या जवळ चाकण येथे एका चित्रपटासाठी शूट करत होते…
गेले कित्येक महिने एक “दुखणं” चालू होतं.. ज्याचे औषध उपचार सुरू होते च..
Shoot चालू असतानाच त्रास वाढला.. 2आणि 3 फेब्रुवारी ला मला shoot ला सुट्टी होती.. म्हणून धावत पळत पुण्यात येऊन dr कडे गेले..
तेव्हा dr नी सांगितलं की आता operation शिवाय सोडणार च नाहीत, नाहीतर दुखणं धोकादायक होऊ शकते..
4 तारखेला शूट असताना 3 ला operation कसं करणार??? शेवटी dr नी नियम बदलून 2 तारखेला रात्री operate करायचं ठरवलं… आणि ताबडतोब admit झाले..Operation व्यवस्थित पार पडले, 24 तासांनी, म्हणजे 3 तारखेला रात्री 9 वाजता discharge दिला..
घरी आले, बॅग घेऊन शूटिंग साठी रवाना झाले.. चाकण ला.. पुढे सलग तीन दिवस काम करून आज् पुण्यात परतले…
माझ्यात एवढी हिम्मत असेल असं माला ही वाटलं नव्हतं. पण रंगदेवतेच्या आशीर्वादाने शूट व्यवस्थित पार पडले..या सर्व प्रसंगात माझ्या घराचे, मित्र परिवार, सहकलाकार आणि hospital चा सगळा स्टाफ , या सर्वानी माझी सोबत केली.. काळजी घेतली..
या सर्वांना “thank you” म्हणून मी त्या ऋणातून बाहेर पडणे कृतघ्न पणाचे ठरेल..योगायोग असा की मी करत असलेल्या चित्रपटाचं नाव “विठ्ठल”.. अणि या सर्वांच्या रूपाने तोच माझी पाठराखण करत होता याची मला पूर्ण खात्री आहे… आपण सर्वांनी मायेनी चौकशी केली, पण सगळ्यांना उत्तर देणे शक्य नव्हते.. म्हणून हा पोस्ट प्रपंच
असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. तुमची अश्विनी, असे तिने यात म्हटले आहे.
दरम्यान अश्विनी कुलकर्णीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिची विचारपूस केली आहे. अनेकांनी कमेट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सध्या अश्विनी ही ‘विठ्ठल’ नावाच्या एका चित्रपटात काम करत आहे.