‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायमच चर्चेत असते. अश्विनी महांगडे ही लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.
अश्विनी महांगडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने नुकतंच पंजाबचे कृषिमंत्री गुरमीत सिंह खुदियान यांची भेट घेतली. यामागचे कारणही तिने सांगितले आहे.
आणखी वाचा : अश्विनी महांगडेच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर, म्हणाली “ही व्यक्तिरेखा…”
अश्विनी महांगडेची पोस्ट
“धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मा. श्री. गुरमीत सिंह खुदियान, (कृषि मंत्री, पंजाब) (कृषि और किसान कल्याण विभाग) यांनी सेट ला भेट दिली. तसेच त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. तसेच “धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर” यांच्या कार्याबद्दल जाणून घेतले. मनपूर्वक धन्यवाद, असे अश्विनी महांगडेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मला माफ करा…”, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हेमांगी कवीने मागितली जाहीर माफी, कारण…
दरम्यान अश्विनी ही लवकरच “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटींगही सुरु करण्यात आले आहे. यात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने तिने पंजाबचे कृषिमंत्री गुरमीत सिंह खुदियान यांची भेट घेतली.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुशांत सोनावले करणार आहेत. तर सोमनाथ शिंदे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट येत्या २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं म्हटलं जात आहे.