मराठी चित्रपटसृष्टीतील लगीनघाई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधना अडकत आहेत, तर काही साखरपुडा करत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोडीदाराशी लग्न करणार नसून ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

भाग्यश्री मोटे हिने १० ऑक्टोबर २०२२ रोजी विजय पालांडेबरोबर साखरपुडा केला होता. गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. साखरपुड्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झाले आहेत. तिने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “मी सर्वांना सांगू इच्छिते की बराच काळ एकमेकांबरोबर राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळं व्हायचं ठरवलं आहे. पण आम्ही चांगले मित्र राहू. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. धन्यवाद,” असं भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे.

when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”

बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याचा…”

विजय पालांडे हा लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने आजवर अनेक सेलिब्रिटींबरोबर काम केलं आहे. भाग्यश्री व विजय यांनी कधीच आपलं नातं लपवलं नव्हतं. ते सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करायचे. दोघांनी दीड वर्षांपूर्वी थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला अभिनेता हृतिक रोशनने हजेरी लावली होती.

साखरपुडा केल्यानंतर दीड वर्षांनी भाग्यश्रीने ब्रेकअपची घोषणा केली आहे. ती व विजय चांगल्या कारणांसाठी वेगळे होत असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader