‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या भाग्यश्रीने नुकतीच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या बहिणीचं निधन झालं असल्याचं भाग्यश्रीने पोस्टद्वारे म्हटलं आहे. बहिणीच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “आज सकाळी उठले आणि…”

भाग्यश्रीने बहिणी मधूबरोबरचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये भाग्यश्री बहिणीली किस करत आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “तू नाही आहेस?”. भाग्यश्रीला दुःख अनावर झालं आहे. बहिणीच्या आठवणींमध्ये तिने आणखी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप

बहिणीच्या खांद्यावर हात ठेवत भाग्यश्रीने आणखी एक फोटो शेअर केला. “तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईतील”. असं भाग्यश्रीने म्हटलं आहे. भाग्यश्रीची ही पोस्ट पाहून तिचे चाहतेही हळहळले आहेत. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून श्रद्धांजली अपर्ण करत आहेत.

भाग्यश्री पुढे म्हणाली, “माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला. माझी आई, बहीण, मैत्रीण सगळं काही तूच होतीस. तुझ्याशिवा मी या आयुष्याचं काय करू? तुझ्याशिवाय जगणं तू मला कधीच शिकवलं नाही. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही”. फेब्रुवारी महिन्यात भाग्यश्रीच्या बहिणीच्या पतीचं निधन झालं होतं. यादरम्यान भाग्यश्रीने फोटो पोस्ट करत माहिती दिली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress bhagyashree mote sister death she share emotional post on instagram see details kmd