मराठी मालिका व चित्रपटविश्वात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भार्गवी चिरमुले. ती फक्त अभिनयातून नाही तर नृत्यामधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. भार्गवीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये ती टोमॅटोचे भाव कमी होतील का? महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? असे ती विचारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडीओत भार्गवी अनेक प्रश्न उपस्थित करीत विचारते, “माझं वजन आज तरी कमी झालं असेल का?, आता तरी महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का?, आज तरी मला पावसात भिजायला मिळेल का?, टोमॅटोचे भाव कमी होतील का?, आपल्या आया कधीतरी वेळेवर फोन उचलतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की नाही हे माहीत नाही. पण, आमच्या कार्यक्रमात मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हा सगळ्यांना नक्की मिळतील. लवकरच…”

Akshay Shinde Encounter Deepak Kesarkar Reacts
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचं एन्काउंटर की हत्या? कथित प्रत्यक्षदर्शीच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे सरकारची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Madgulkar theater, Prashant Damle,
ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाबाबत अभिनेते प्रशांत दामले यांची खंत, म्हणाले…
Supriya sule and ajit pawar
Supriya Sule : “अजित पवार आमचं आयुष्य विस्कळीत करून गेले”, सुप्रिया सुळेंचं विधान; म्हणाल्या…
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
Navra Maza Navsacha 2 Bharud song Viral
Navra Maza Navsacha 2: “मुकूट घालीन ५० खोक्यांचा…”, सिद्धार्थ जाधवचं बाप्पाला साकडं; व्हायरल होणाऱ्या भारूडात राजकीय चिमटे, ऐका…
one leader one election in name of nation whatever is going on today is not a nation
नागपूर : “एक नेता, एक निवडणूक म्हणजे राष्ट्रहित नव्हे,” साहित्यिक-समीक्षकांचे मत
mala kahitari sanghaychay Eknath sambhaji shinde natak
रंगभूमीवरही महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अंक

हेही वाचा – “लोकांना मी माजुरडा वाटतो,” असं सोहम बांदेकर का म्हणाला?

अभिनेत्रीनं हा व्हिडीओ शेअर करीत लिहिलं आहे, “अधिक म्हणजे वाढ म्हणजे वृद्धी म्हणजेच मिळवणे.. एक माणूस म्हणून किंवा व्यक्ती म्हणून मिळवत जाणे किंवा वाढ होणे हे प्रगतीचे लक्षण आहे. अशाच एका वाढीच्या टप्प्यावर मी आलेय… अधिक श्रावण महिनाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येतेय लवकरच …”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने गायली अंगाई, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी…”; दीप अमावस्येबद्दल केतकी चितळेने केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, भार्गवीचा हा व्हिडीओ पाहून सध्या इतर मराठी कलाकार तिला नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्राचा हा नवा कोरा कार्यक्रम कुठे, केव्हा, कधी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय, हे येत्या काळात समजेल.