मराठी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा ‘फुलराणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. हा चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने पोस्ट शेअर केली आहे.
भार्गवी चिरमुले ही सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच भार्गवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने प्रियदर्शनीबरोबरचे फोटोही पोस्ट केले आहेत. त्याबरोबर तिने कॅप्शन लिहित प्रियदर्शनीच्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “माझ्या आयुष्यात…” ओंकार राऊतबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर प्रियदर्शनी इंदलकरची प्रतिक्रिया
भार्गवी चिरमुलेची पोस्ट
“काही माणसें आपल्याला भेटतात ती आपली होऊन जातात….पुढे जाऊन ती माणसे वेगळ्या वाटेला जातात तरी त्याचाशी ते बंध तसेच राहतात… त्यांची प्रगती त्याचं यश त्यांची मेहनत पाहून आपल्याला कायम आनंद आणि अभिमान वाटत राहतो आणि मग ते कायमचे ऋणानुबंध होऊन जातात, तशीच हे माझी लाडकी प्रियदर्शनी अर्थात फुलराणी आज तिचा पहिला सिनेमा प्रदर्शित होतोय, नक्की जाऊन जवळच्या चित्रपटगृहात पहा….संपूर्ण टीम ला ऑल द बेस्ट.
झगमगा आणि प्रियदर्शिनीला पाहा, गॉड ब्लेस यू माय लव्ह आणि लवकर भेट”, असे भार्गवी चिरमुलेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “वयाने लहान असलेल्या मुलींबरोबर काम करायला…” सुबोध भावेचे थेट उत्तर
दरम्यान फुलराणी हा चित्रपट गेल्या २२ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसत आहे. तर सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाची ट्रेलर, गाणी सुपरहिट झाली आहेत.