बहुचर्चित अशा ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ला सुरुवात झाला आहे. १४ मेपासून सुरू झालेला ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ २५ मेपर्यंत असणार आहे. या फेस्टिव्हलला अनेक दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलाकार ‘कान फेस्टिव्हल’साठी रवाना झाले आहेत. काल, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लेक आराध्या बच्चनसह ‘कान फेस्टिव्हल’साठी रवाना झाली. यंदाही ऐश्वर्या आपल्या सौंदर्याचा जलवा कानच्या रेड कार्पेटवर दाखवणार आहे. मुंबई विमानतळावर ऐश्वर्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये ती जखमी हातासह रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे.
‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’साठी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री देखील रवाना झाल्या आहेत. सध्या या अभिनेत्रीचं नाव हिंदी सिनेसृष्टीत खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटातील त्यांच्या जबरदस्त अभिनयाचं कौतुक होतं आहे. आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल या अभिनेत्री कोण आहेत?
हेही वाचा – आईच्या निधनाच्या ६ महिन्यांनंतर तेजश्री प्रधानने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, ‘पाठिशी आहेस ना…”
‘कान फिल्म फेस्टिव्हल’साठी निघालेल्या या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून छाया कदम आहेत. अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून ‘कान फेस्टिव्हल’ला निघाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विमानतळावरचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “चला कान…”
छाया कदम यांच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमिर खानची दुसरी पत्नी, दिग्दर्शक किरण राव छाया यांचा फोटो पाहून म्हणाली, “तुझा वेळ चांगला जावो.” तसंच रवी जाधव म्हणाले, “व्वा…कडकड चंद्रक्का.” याशिवाय अभिनेत्री अश्विनी कासार, प्रियदर्शनी इंदलकर, नंदिता पाटकर अशा अनेक कलाकारांनी छाया कदम यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्यांच्या दोन हिंदी चित्रपटांचा खूप बोलबोला आहे. किरण राव दिग्दर्शित ‘लापजा लेडिज’ चित्रपटात छाया यांनी मंजू माईची भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. छाया यांचे चित्रपटातील बरेच डायलॉगचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. याशिवाय कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटात छाया कदम झळकल्या आहेत. या चित्रपटातील देखील त्यांच्या कामाचं कौतुक होतं आहे.