मराठमोळ्या छाया कदम यांनी यंदाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ गाजवला. त्यांच्या चित्रपटाला या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात मानाचा पुरस्कार मिळाला. छाया कदम ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ संपवून भारतात आल्यात आहेत. इंडस्ट्रीतील त्यांचे मित्र-मैत्रिणी त्यांचं कौतुक करत आहेत. त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

आजवर अनेक हिंदी व मराठी चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या छाया कदम या अविवाहित आहेत. छाया कदम यांनी लग्न केलं नाही. याबद्दल त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. लग्नाबद्दल विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबद्दल छाया कदम म्हणाल्या, “मला वाटतं काही वर्षांपूर्वी असे प्रश्न यायचे, आता सगळं बदललं आहे. आता तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय घेऊन छान राहू शकता. माझ्या लग्न झालेल्या ९० टक्के मैत्रिणी म्हणतात’ बरं झालं तू लग्न नाही केलंस’. शेवटी काय तर खुश राहणं महत्त्वाचं असतं. तुम्ही दुसऱ्यांना त्रास न देता खुश राहा आणखी काही नाही.”

‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

छाया कदम यांनी नुकताच एक तब्बूबरोबरचा किस्सा सांगितला होता. छाया यांनी ‘अंधाधून’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री तब्बूबरोबर काम केलं होतं. चित्रपटाच्या सेटवर फारसं बोलणं झालं नव्हतं, पण तब्बूने खास फोन करून कामाचं कौतुक केलं होतं, इतकंच नाही तर तिने चित्रपटाचं खास स्क्रीनिंग ठेवलं होतं आणि त्यासाठी निमंत्रण दिल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील गावी असताना तब्बूने फोन केला होता आणि तिच्या मित्र- मैत्रिणींना ‘अंधाधून’ चित्रपटात छाया कदमांचं काम आवडलं होतं, असं तिने म्हटलं होतं.

“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

दरम्यान, छाया कदम यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्या यंदा ‘लापता लेडीज’मधील त्यांच्या भूमिकेमुळे खूप चर्चेत राहिल्या. किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी मंजूमाई ही भूमिका केली होती. रेल्वे स्टेशनवर फूड स्टॉल लावणाऱ्या मंजूमाईची भूमिका त्यांनी अत्यंत उत्तमरित्या साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘मडगांव एक्सप्रेस’ या चित्रपटात कंचन कोंबडी हे पात्र साकारलं. उपेंद्र लिमये व छाया कदम यांनी या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांचं खूप कौतुक झालं. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅकआउट’ चित्रपटात छाया कदम यांनी काम केलं आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका आहे. यात मौनी रॉय, रुहानी शर्मा, सुनील ग्रोव्हर, अनंत जोशी व छाया कदम दमदार भूमिकेत आहेत.