मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री सध्या चर्चेत आहे. रितिकाने बालकलाकार म्हणून ‘गुंतता हृदय हे’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून पदार्पण केलं. नंतर ‘स्लॅमबुक’, ‘बॉईज’, ‘डार्लिंग, लंडन मिसळ अशा चित्रपटांमध्ये रितिका प्रमुख भूमिकेत झळकली.
रितिका सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी रितिका अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही त्यांच्याबरोबर सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या सगळीकडे ‘पुष्पा-२’ च्या गाण्याचा ट्रेंड सुरू आहे. या चित्रपटातील ‘सूसेकी’ हे गाणं रीलिज झाल्यापासून या गाण्यावर इंफ्लूएन्सर्ससह अनेक कलाकार थिरकताना दिसतायत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारदेखील या गाण्यावर थिरकले आहेत. आता रितिका श्रोत्रीने हटके डान्स स्टेप करत या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा… नववधू सोनाक्षी सिन्हाबरोबर थिरकली काजोल, झहीर इक्बालनेही धरला ठेका, Video Viral
रीतिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सूसेकी’ गाण्याच्या हुक-स्टेप करत रितिका अगदी उत्साहाने डान्स करताना दिसतेय. वेगळेपण म्हणजे टॅंक टॉप आणि शॉर्ट्स घालून रितिका या गाण्यावर थिरकली आहे. “जेव्हा तुम्हाला कपल गाण एकटीलाच करावं लागतं तेव्हा…” असं कॅप्शन रितिकाने या व्हिडीओला दिलं आहे.
रितिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “साडी नेसायची स्टाईल जरा कॅज्युअल आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “रितिका याच्यापेक्षा तू साडी नेसून हा डान्स केला पाहिजे होता कारण तू साडीमध्ये खूप छान दिसतेस आणि हा डान्स खूप छान झाला असता.” तर एका युजरने तिला “महाराष्ट्राची रश्मिका” असं म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत रितिकाला विचारलं, “पुष्पा कुठे आहे?”
अवघ्या काही वेळातच या व्हिडीओला १ लाखाच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारांच्यावर चाहत्यांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.
दरम्यान, रितिका श्रोत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, रितिका शेवटची ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात झळकली होती.
© IE Online Media Services (P) Ltd