सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १७व्या मोसमात पराभवाने सुरुवात केली आहे. काल गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा पाचवा सामना रंगला. या सामन्यात गुजरातने १६९ धावांचं आव्हान मुंबईला दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबईने २० षटकांत ९ बाद १६२ धावा केल्या. आयपीएलमधील हा पहिला सामना मुंबई इंडियन्सने ६ धावांनी गमावला. मुंबईच्या या पराभवाला सध्या कर्णधार हार्दिक पंड्याला जबाबदार धरलं जात आहे. या सामन्यानंतर एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमधून अभिनेत्रीने पंड्याला टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: अगदी सलमान खानवर गेलाय सोहेलचा मुलगा, बाबा सिद्दीकीच्या रफ्तार पार्टीतील निर्वाण खानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्री दीप्ती देवीने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून तिने पंड्याला लक्ष्य केलं आहे. अभिनेत्री दीप्ती देवीने लिहिलं आहे, “भाई पंड्या तू अजून मनाने गुजरातबरोबरच आहेस…”

दरम्यान, याआधी गुजरात टाटयन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या होता. तो आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला असून शुबमन गिल गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सांभाळत आहे. कालच्या पराभवाने मुंबई इंडियन्सने ११ वर्षांचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१३ पासून आतापर्यंत कधीही पहिला सामना जिंकलेला नाही.

हेही वाचा – Video: रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर डान्स अन्…, नारकर जोडप्याने ‘अशी’ साजरी केली धुळवड, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री दीप्ती देवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने बऱ्याच मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘अंतरपाट’, ‘मला सासू हवी’ या तिच्या मालिका चांगल्याचं गाजल्या होत्या. सध्या दीप्ती नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलीकडे ती ‘पंचक’, ‘नाळ २’ यांसारख्या चित्रपटात झळकली होती. लवकरच ती ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दीप्ती स्वप्नील जोशी, सागर कारंडे, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, नम्रता गायकवाड या कलाकारांबरोबर दिसणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress deepti devi share post after mumbai indians lost match against gujarat titans ipl 2024 pps