मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे कायमच लोकप्रिय ठरताना दिसतात. यातील अनेक कलाकारांना काम करताना अनेक चित्र-विचित्र अनुभव येताना दिसतात. नुकतंच नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातील अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल भाष्य केले आहे.
‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून दिप्ती देवीला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून दिप्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती आजही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे सतत हसतमुख असणारी दिप्तीने नुकतंच कास्टिंग काऊच या विषयाबद्दल मत मांडले आहे.
आणखी वाचा : ‘क्रश’ प्रकरणानंतर पहिल्यांदाच ओंकार भोजने आणि कोकण हार्टेड गर्लची भेट, लाजत म्हणाली “‘त्या’नंतर…”
“कास्टिंग काऊच हा प्रकार सगळीकडेच असतो. कोणतंही क्षेत्र त्याला अपवाद नाही. काही माणसं या भावनेचा ताकद म्हणून उपयोग करतात. तर काही लोक अमुक गोष्टीसाठीची अट म्हणून तिचा वापर करून घेतात. अनेकांचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, असे दिप्ती म्हणाली.
जेव्हा हे अती व्हायला लागतं किंवा त्यालाच महत्त्व यायला लागतं, तेव्हा निश्चितच त्याचा त्रास होतो. पण आपल्याकडे नेहमीच ठामपणे ‘नाही’ म्हणण्याचा पर्याय असतो. सगळ्यांनी ठरवलं, की हे होऊ द्यायचं नाही, तर या पात्रतेवर कुणी कास्टिंग करणार नाही. इथं नाही म्हणायची ताकद असेल, तर ती वापरायला हवी आणि मुळात असं सगळ्यांना वाटायला हवं”, असे मत दिप्तीने मांडले.
आणखी वाचा : “माझा पाय सुजला नसता तर…”, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव, म्हणाली “ती गाठ कर्करोगाची…”
दरम्यान मालिका आणि चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री दप्ती देवीनं तिची ओळख निर्माण केली. ‘नाळ’, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात दिप्ती झळकली होती. दिप्तीच्या या चित्रपटातील अभिनयाचे कौतुकही झालं. या आधी तिने ‘कंडिशन्स अप्लायः अटी लागू’, ‘पेज ४’, ‘अंतरपाट’, ‘परिवार-कर्तव्य की परीक्षा’, ‘इंदोरी इश्क’, ‘अपने अपने रिश्तों की बोली’ अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.