‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून दिप्ती देवीला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून दिप्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ती आजही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे सतत हसतमुख असणारी दिप्तीने नुकतंच मनोरंजनसृष्टीतील गटबाजीबद्दल भाष्य केले आहे.

दिप्ती देवीने नुकतंच महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने “सिनेसृष्टीत गटबाजी कायम असते, पण तुम्ही त्याकडे सकारात्मक नजरेने पाहिलं पाहिजे”, असे उत्तर दिले.
आणखी वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल मांडले स्पष्ट मत, म्हणाली “काही लोक अट म्हणून…”

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Deepti Devi
घटस्फोटानंतर पुन्हा रिलेशनशिपचा विचार केला नाहीस का? दीप्ती देवी म्हणाली, “मला परत स्वत:ला…”
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aai kuthe kay karte fame Rupali bhosale bought a new car
Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ
billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”

“आपण ‘ग्रुपिझम’कडे सकारात्मकतेनं पाहिल्यास एकमेकांबरोबर काम करताना आपल्याला आत्मविश्वास दिसतो. त्यामुळे गटबाजी होणं किंवा असणं फारच नैसर्गिक आहे. मलाही अनेकजण ‘आटपाट’च्या ग्रुपमध्ये दिसण्यावरुन बोलू शकतात. पण शेवटी तो तुमच्या कम्फर्टचा भाग असतो. एखादी टीम जमण्याचा भाग असतो”, असे तिने सांगितले.

“कलाकार म्हणून आम्ही नेहमीच संधीचे भुकेले असतात. अनेकदा काही प्रोजेक्ट्स किंवा कामं पाहून हे माझ्यापर्यंत का पोहोचलं नाही, असा विचार मनात येतो. त्याचा फटका नक्की बसतो. कलाकार म्हणून माझी क्षमता मला माहीत आहे. इतरांनी त्याकडे कसं पाहावं, हे मी ठरवू शकत नाही”, असेही ती म्हणाली.

आणखी वाचा : “माझे वडील रिक्षा चालवायचे, आई घरी शिवणकाम करायची; पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे…” शिवाली परबचा खुलासा

“माझ्या कामाशी प्रामाणिक राहण्याला मी प्राधान्य देते. ग्रुपिझम चालतच राहील. त्यातून संधी शोधायची आणि मनापासून काम करायचं. जिथं आवश्यक आहे, तिथं थेट सांगायचं की तुमच्यासोबत काम करायला आवडेल. कलाकार म्हणून स्वतःला चॅलेंज करत राहणं, हीच माझ्यासाठी रोजची कार्यशाळा असते आणि अशा आव्हानांसाठी मी तयार राहते”, असे दिप्तीने यावेळी म्हटले.

दरम्यान मालिका आणि चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री दप्ती देवीनं तिची ओळख निर्माण केली. ‘नाळ’, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात दिप्ती झळकली होती. दिप्तीच्या या चित्रपटातील अभिनयाचे कौतुकही झालं. या आधी तिने ‘कंडिशन्स अप्लायः अटी लागू’, ‘पेज ४’, ‘अंतरपाट’, ‘परिवार-कर्तव्य की परीक्षा’, ‘इंदोरी इश्क’, ‘अपने अपने रिश्तों की बोली’ अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.