पावसाळा आला की रस्त्यांची दूरवस्था, रस्त्यांवरील खड्डे याची चर्चा होऊ लागते. पावसाळ्यात कोकणात जायचं असेल तर रस्ते इतके खराब आहे की वेळेवर पोहोचणं शक्यच नाही. कोकण स्वर्गाइतकं सुंदर आहे, पण रस्ता खूप कठीण आहे असं ‘पुष्पक विमान’ फेम मराठी अभिनेत्री गौरी किरणने एक व्हिडीओ शेअर करून म्हटलं आहे. तिने मुंबई-गोवा हायवेची दूरवस्था या व्हिडीओतून दाखवली आहे.

अमिताभ बच्चन यांचं महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दलचं ‘ते’ ट्वीट व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”

“कोकण हा खरंच स्वर्ग आहे, कारण स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण आहे,” असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर तिने मुंबई-गोवा हायवे दाखवला आहे. या हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहे, ज्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे.

तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘रस्त्यात खड्डे..आहेत की खड्ड्यात रस्ते हाच मोठा प्रश्न आहे’, ‘मराठी कलाकार सुद्धा अश्या सामाजिक प्रश्नवर बोलतात तेव्हाच आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा विकास होईल कारण सरकारी प्रतिनिधी या गोष्टींवर लक्षच घालत नाही. कलाकरांच्या मदतीने तरी सामान्य माणसाला न्याय मिळेल,’ अशा प्रतिक्रिया काही चाहत्यांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.

gauri kiran post comments
गौरी किरणच्या पोस्टवरील कमेंट्स

दरम्यान, गौरी किरण ही कोकणातील वेरळ गावची आहे. मुंबईहून कोकणात जाताना तिने मुंबई गोवा हायवेवरील खड्डे दाखविण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आणि चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.