Anant Ambani and Radhika Merchant Wedding Invitation : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी हा लग्नसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. या लग्नासाठी खास देश-विदेशातून पाहुणे मंडळी मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ग्रँड लग्नसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला यापूर्वी बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. या दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला होता. यानंतर अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचं आयोजन इटलीत क्रुझवर करण्यात आलं होतं. आता सगळेजण अनंत-राधिकाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गरबा नाइट्स, संगीत सोहळा, हळद, मेहंदी, शिवपूजा असे सगळे विधी पार पडल्यावर १२ जुलै रोजी म्हणजेच उद्या हे जोडपं सात फेरे घेणार आहे. मुकेश अंबानीनी मुलाच्या लग्नाचं आमंत्रण अनेक सेलिब्रिटींना पाठवलं आहे. यामध्ये श्रेयस राजे या मराठी अभिनेत्याचा समावेश आहे. श्रेयस पाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्रीला अंबानीच्या लग्नसोहळ्याचं निमंत्रण आलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…
हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं अरेंज मॅरेज, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डिलीट केले पतीबरोबरचे फोटो; नेमकं काय घडलं?
मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्रीला पाठवली लग्नपत्रिका
अंबानींच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीला देखील या लग्न सोहळ्याचं खास निमंत्रण आलं आहे. हिंदीसह मराठी कलाविश्व गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. आता येत्या काळात ती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याचं अमृताला देखील खास आमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नपत्रिकेचा खास फोटो व व्हिडीओ आता समोर आला आहे. लग्नाच्या पत्रिकेवर अमृता खानविलकरचं नाव लिहिण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राधिका व अनंत अंबानी यांचा लग्नसोहळा १२ ते १५ जुलैपर्यंत पार पडणार आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. तसेच रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.