Marathi Actress Kelvan : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. तसेच आता येत्या काही दिवसात ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, किरण गायकवाड, शाल्व किंजवडेकर, विरीशा नाईक, हेमल इंगळे असे बरेच कलाकार लग्न करणार आहेत. यापैकी हेमलच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचं केळवण नुकतंच पार पडलं. याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटातून हेमलने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हेमलने ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. आता लवकरच हेमल बोहल्यावर चढणार आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरचे टोपणनाव माहीत आहे का? सहकलाकार खुलासा करत म्हणाली..

हेमल काही दिवसांपूर्वीच तिच्या जवळच्या मैत्रिणींसह बॅचलर पार्टी साजरी करण्यासाठी थायलंडला गेली होती. बॅचरल पार्टी झाल्यावर आता कोल्हापुरात अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचे खास फोटो हेमलने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “केळवणाला सुरुवात…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. यावेळी तिचा होणारा पतीदेखील उपस्थित होता. फुलांची सजावट करून या दोघांचा केळवण समारंभ एकत्रितरित्या पार पडला. हेमलने यावेळी गडद निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला होता.

हेमलच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव रोनक असं आहे. आता केळवण पार पडल्यावर हेमल लग्नबंधनात केव्हा अडकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र, अभिनेत्रीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

हेही वाचा : “देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा : ५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

दरम्यान, हेमलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेसह स्क्रीन शेअर केली होती. यानंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिला सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, स्वप्नील जोशी अशा दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemal ingle shares kelvan ceremony photos actress soon to be married sva 00