मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांना प्रेक्षक उत्तम दाद देतात. त्याचबरोबरीने हेमांगी सोशल मीडियावरही अधिक सक्रिय आहे. महिलांविषयी एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलते. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं तिला आवडतं. आताही तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

हेमांगी तिच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते. चित्रीकरणादरम्यानचे तसेच कुठेही फिरायला गेले असल्याचे फोटो व व्हिडीओ ती शेअर करते. आताही हेमांगी तिच्या गावी गेली आहे. कामामधून ब्रेक घेत ती तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हेमांगीने मॅक्सी घातलेली दिसत आहे. तसेच हेमांगीने तिच्या गावचा घराचा फोटोही शेअर केला आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा – नितेश पांडेंची शेवटची पोस्ट पाहून चाहतेही हळहळले, तीन महिन्यांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

हेमांगी म्हणाली, “जगात, देशाबाहेर कितीही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है! जेव्हा मला कुणी सांगतं की, त्यांना गावच नाही. तेव्हा मला कसंसच होतं”.

आणखी वाचा – ५१व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू, निधनापूर्वी नितेश पांडे कुठे होते? अभिनेत्याच्या मृत्यूबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची नवी माहिती

“लहानपणी मला प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते. काही जण येऊन-राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत. गाव नसणं म्हणजे आई-वडील नसण्यासारखं मला वाटतं. मी खरंच भाग्यवान आहे, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे!” पुढे ती म्हणाली, “त.टी. – कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती”. हेमांगीच्या साधेपणाचं नेटकऱ्यांनीही कौतुक केलं आहे. ग्लॅमरस लूकमध्ये नव्हे तर साध्या राहणीमानावर ती विश्वास ठेवते याचं नेटकऱ्यांना कौतुक वाटलं.

Story img Loader