मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एका चित्रपटाच्या सीनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना तिने या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

हेमांगी कवीची पोस्ट

“रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोचले. २००८ साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहीलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल.

हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे. यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सग्गळं काहीही न बोलता अगदी मोजक्या expressions मध्ये दाखवणं खुप कठीन असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं one take मध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं! माझं तरी निघतं!

ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर screen share करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी!”, असे हेमांगी कवीने या पोस्टमध्ये म्हटले.

आणखी वाचा : “फक्त मी आणि माझा…”, संतोष जुवेकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, कॅप्शन चर्चेत

दरम्यान हेमांगीच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने एक कमेंट केली आहे. हेमांगी, तुझ्या आतापर्यंतच्या कामातील सर्वोत्तम काम. रवींद्र काकांबरोबर काम केल्याचा आशीर्वाद तुला मिळाला, अशी प्रतिक्रिया स्पृहाने दिली आहे. त्यावर हेमांगीने धन्यवाद असे म्हटले आहे.

Story img Loader