मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींना संघर्षाचा सामना करावा लागला. काहींना तर त्यांच्या सावळ्या रंगामुळे नाकारण्यात आले होते. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्याबरोबर सिनेसृष्टीच्या सुरुवातीला घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत हेमांगी कवीने भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमांगीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिचे करिअर, सोशल मीडियावरील पोस्ट आणि तिचा संघर्षाबद्दल भाष्य केले. यावेळी तिने ‘मला रंगामुळे ६ प्रोजेक्टसाठी नकार देण्यात आला होता’, असे ती म्हणाली.
आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा 

हेमांगी कवी काय म्हणाली?

“अभिनेत्री म्हणजे गोरी, उंच, घारी अशी छान दिसणारी हेच समीकरण होते. त्यात मी स्वत:ला हिरोईन म्हणून कुठेही बघत नव्हते. त्यामुळे मी मला कुठेतरी छोटे मोठे पात्र मिळाले तरी असं करुन सिनेक्षेत्रात गेले. अभिनयाच्या जोरावर काम मिळवूया, हे मी ठरवलं होतं. मला सावळ्या रंगावरुन खूप वेळा नकार देण्यात आला.

माझे विविध चॅनल्ससाठी ६ प्रोजेक्ट्स तयार होते. त्यातील एका चॅनल तर म्हणणं असं होतं की, आमच्या पूर्ण इतिहासात आमची अभिनेत्री काळी नाहीये. ते सहा प्रोजेक्ट झाले नाही आणि काही वर्षांनी तेच सहा प्रोजेक्ट गोऱ्या आणि अशा मुलींना घेऊन करण्यात आले.

माझं म्हणणं असं होतं की, तुम्हाला रंग ही समस्या आहे. अभिनय असेल तर तुम्ही मला सांगा. तुझा अभिनय अप टू मार्क नव्हता, हे तुम्ही मला सांगा. हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही ऑडिशन देता, सर्व गोष्टी करता, सर्व गोष्टींचं फायनल होतं त्यानंतरच तुम्ही पायलट होता, मग हे तुम्हाला आधी कळत नाही का?” असा प्रश्न हेमांगीने विचारला.

आणखी वाचा : “आम्ही आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे”, हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली “ते केल्यामुळेच…”

दुसऱ्या दिवशी मला त्यांनी फोन करुन सांगितलं की, “बेटा तुझ्या रंगामुळे अडचण आहे.” त्यावर मी म्हटलं, “अच्छा ओके, मी रंग तर बदलू शकत नाही. अभिनयाची काही समस्या नाही ना…” तर ती म्हणाली “अभिनय अगदी योग्य होता. आमच्या पूर्ण इतिहासात आमची अभिनेत्री काळी नाही.” मी ओके म्हटलं आणि त्यानंतर चार पाच वर्षांनी सावळ्या मुली मुख्य भूमिकेत झळकणारा ट्रेंड आला. हे आधी केलं असतं तर तुमचं नुकसान…., असेही हेमांगीने यावेळी सांगितले.

दरम्यान हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत होती. त्याबरोबरच ती ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातही झळकली होती. तसेच तिने अनेक नाटकांमध्येही काम केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi faced rejection because of dark skin tone share experience nrp