ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ना. धों. महानोर यांना रानकवी म्हणून ओळखलं जायचं. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ना. धों. महानोर यांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच तिने काही भावूक आठवणींनाही उजाळा दिला आहे.
आणखी वाचा : “असा कसा नियतीचा खेळ…” ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर सोनाली कुलकर्णी भावुक, म्हणाली “कालच्या धक्क्यातून…”

हेमांगी कवीची पोस्ट

“काल नितीन देसाई गेल्याची बातमी ऐकल्यापासून त्यांनी निर्माण केले भव्या दिव्य sets डोळ्यासमोर येत राहीले कुठल्या कुठल्या सिनेमातले आणि कानात एकच गाणं ऐकू येत होतं. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अजिंठा’ सिनेमातलं…
‘मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले’
का कुणास ठाऊक? रात्री याच गाण्यातली पावसाळी दृश्य पापण्यांवर तरळत राहीली आणि ओळी ऐकू येत राहील्या. अगदी झोप लागेपर्यंत! सकाळी उठले आणि कळलं आज ‘ना.धो. महानोर’ गेले!
काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी!
आज दिवसभर जैत रे जैत, एक होता विदूषक, मुक्ता, सर्जा मधली गाणी कानात घुमत राहतील!
“काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्ल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळं”
अलविदा, रानकवी!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…”, नितीन देसाईंची शेवटची इच्छा काय होती? ND स्टुडिओतील कर्मचाऱ्याचा खुलासा

दरम्यान ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi instagram post for veteran marathi poet literary n d mahanor passed away nrp