मराठी सिनेसृष्टीतली ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. गेल्यावर्षीच ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच निधन झालं होतं त्यानंतर आज सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टील अनेक कलाकारांकडून सीम देव यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री हेमांगी कवीनेही पोस्ट शेअर करत सीम देव यांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- “ते यान चंद्रावर व्यवस्थित लँड झालं तसं…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने सीमा देव यांचा तरुणपणीचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने तिच्या लहानपणीची सीमा देव यांच्याशी निगडीत एक आठवण सांगितली आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले.
Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! ?
खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं!
सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम!

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं होतं. मोलकरीण या सिनेमात हे गाणं होतं. २०२० मध्ये सीमा देव यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडेही सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती.

Story img Loader