मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. महिलांविषयी एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. नुकतंच हेमांगी कवीने तिच्या आई-वडिलांबद्दल आणि घरातील प्रायव्हसीबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमांगीने आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रात काम केली आहेत. यात विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. हेमांगी कवी ही कायमच तिच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतंच हेमांगीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये तिच्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या केल्या.
आणखी वाचा : सासू असावी तर अशी! तुमची सून चक्क १० पर्यंत झोपते म्हणणाऱ्यांना हेमांगी कवीची सासू द्यायची भन्नाट उत्तर, म्हणायच्या “ती रात्री…”

“माझी आई सातवी शिकली होती. ती गावात राहिलेली आहे आणि बाबा एलएलबी झाले. आमच्या घरात बराच मोकळेपणा होता. ‘टायटानिक’, ‘दयावान’ यासारखे अनेक चित्रपट आम्ही एकत्र बसून पाहिले आहेत. किसिंग सीन लागला की रिमोटची शोधाशोध असं काहीही आमच्या घरी व्हायचं नाही. इंटिमेट सीन सुरु झाला की पळापळ वैगरे असं कधीच काही व्हायचं नाही. आम्ही ते पाहत बसायचो”, असेही ती म्हणाली.

“हे आता पाहायचं नाही, हे वाईट आहे, असं त्यांनी कधीच केलं नाही. ही जवळपास ९३-९४ काळातील गोष्ट. तेव्हा माझ्या मैत्रिणींच्या घरी हे लपवलं जातं, याचा मला पत्ताच नव्हता. मला तेव्हा वाटायचं ही सर्व नॉर्मल आहे”, असेही तिने सांगितले.

आणखी वाचा : “तिच्यामुळे मी…” हेमांगी कवीने तब्बल २ वर्षांनी सांगितलं ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टमागील खरं कारण

आणखी वाचा : “आई-वडिलांनी आमच्यात कधीच भेदभाव केला नाही” हेमांगी कवीचा खुलासा, म्हणाली “उलट भावाला…”

“त्यावेळी सर्वचजण वन रुम किचन या अशा घरात राहायचे. बाबा-आईची प्रायव्हसी वैगरे हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ते पाहिलं होतं, तेव्हा मी ताईला विचारलं होतं की ‘आई-बाबा नेमकं काय करत होते?’ तेव्हा माझ्या ताईने ‘हे असंच असतं आणि या गोष्टींमुळेच आपण आलेलो आहोत.’ आपण जागे असतो. सर्वांनी या गोष्टी पाहिलेल्या असतात. ते केल्यामुळेच आमचा जन्म झालेला आहे, आम्ही या जगात आलो आहोत, याची समज यायला हवी”, असे हेमांगी कवीने म्हटले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi talk about her mother father privacy and childhood education nrp
Show comments