मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. महिलांविषयी एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. नुकतंच हेमांगीने तिचे कपडे आणि फॅशन याबद्दल भाष्य केले आहे.

हेमांगी कवी ही कायमच तिच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने सिनेसृष्टी, सोशल मीडिया आणि कपडे यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबर तिने पुरुषांना एक हटके सल्लाही दिला आहे.
आणखी वाचा : ‘क्रश’ प्रकरणानंतर पहिल्यांदाच ओंकार भोजने आणि कोकण हार्टेड गर्लची भेट, लाजत म्हणाली “‘त्या’नंतर…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bengaluru techie's wife files dowry harassment complaint, claims she was treated like a Animal.
Atul Subhash : “मला जनावरासारखे वागवले…”, काय आहेत अतुल सुभाष यांच्यावर पत्नी निकिताचे आरोप?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…

हेमांगी कवीची पोस्ट

“Maturity is when u don’t feel like shopping for clothes anymore! थोडं weird आहे पण खरंय!

मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल shopping केलं नाही. Literally. एकतर on and off lockdown चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय. माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या condition मध्ये आहेत आणि मी ते वापरते. काही माझ्या भाच्यांना देते. काही mix match करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये shooting set, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या personal कपड्यांचा कमीत कमी वापर.

पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी Social Media मुळे एकदा का एका outfit वर तुम्ही एखादा photo post केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे repeat करते. त्यावरचे photos ही post करते. बिनधास्त. काही आगाऊ लोकं comments मध्ये त्यांच्या बारीक observation ची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण now I don’t care. आता मी ४-५ महीन्यातून एकदा shopping करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं.

या post मधून देशा समोर उभे असलेले problems solve होणार नाहीएत किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीए पण मला share करावंसं वाटलं म्हणून केलं. आता मला ती maturity गाठायची आहे जेव्हा हे असलं काही share करणं ही निरर्थक वाटू लागेल! You Wish me a luck and I wish u a Happy Sunday!

त.टी.: मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, online च्या, offline च्या स्रियांना ‘shopping कसं करू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणून ही post वाचून दाखवू किंवा forward करू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल!”, असे हेमांगीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

आणखी वाचा : पालकांच्या प्रायव्हसीबद्दल हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

दरम्यान हेमांगीने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रात काम केली आहेत. यात विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. हेमांगी काही दिवसांपूर्वी ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत झळकली होती. त्याबरोबरच ‘पिपाणी’, ‘बंदीशाळा’, ‘डावपेच’ या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘तमाशा Live’ या चित्रपटामध्ये देखील हेमांगीनं काम केलं होतं.

Story img Loader