मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप उमटवणारी सोज्वळ अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृताने कधी दुर्वा, कधी वैदेही तर कधी दीपू म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर हृताने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं. तिने ‘अनन्या’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. मग तिने ‘टाइमपास ३’, ‘कन्नी’ यांसारख्या चित्रपटात झळकली. मालिका, चित्रपट करताच दुसऱ्या बाजूला ती रंगभूमी पण गाजवतं होती. ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हृताच्या या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये हृताने स्वतंत्र स्थान निर्माण केल्यानंतर वेब सीरिजच्या दुनियेत पदार्पण केलं. ‘कमांडर करण सक्सेना’ या वेब सीरिजमध्ये हृता झळकली. या सीरिजमधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. अशातच हृताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे; जी खूप चर्चेत आली आहे.
हेही वाचा – “मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
“ती – तू मला आधी का नाही भेटलास?…तो – तुझी वाट बघण्यात वेळ गेला…वेड लागणार नसेल तर प्रेम करण्यात काही गंमत नाही…घेऊन येतोय त्याची आणि तिची क्रेझी लव्हस्टोरी. फिल्मींग नाउ…तुमच्या आणि आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही दोघांनी एकत्र काम करून दाखवलं. लवकरच भेटूया चित्रपटगृहात,” असं कॅप्शन लिहित हृताने लोकप्रिय मराठी अभिनेत्याबरोबर रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
हृताने शेअर केलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून ललित प्रभाकर आहे. त्यामुळे सध्या तिची पोस्ट व्हायरल झाली आहे.
हेही वाचा – करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
हेही वाचा – Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
हृताच्या या पोस्टमधून तिचा लवकरच ललित प्रभाकरबरोबर नवा चित्रपट येत असल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटात नवी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. या नव्या चित्रपटाचं नाव काय असणार आहे? चित्रपटात अजून कोणते कलाकार पाहायला मिळणार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.