ऋता दुर्गुळे सध्या तिच्या ‘सर्किट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मराठी मालिकांमुळे नावारुपाला आलेली ऋता आता चित्रपटांकडे वळली आहे. तिचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमध्ये तिने काम केलं. कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण या सगळ्या प्रवासात ऋताला काही प्रसंगांचा सामनाही करावा लागला. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे.
सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात ऋताने एक प्रसंग सांगितला. एका पार्टीदरम्यान तिच्यावर करण्यात आलेल्या कमेंटबाबत तिने भाष्य केलं. तसेच माझं काम बोलतं म्हणून मी बिनधास्त बोलते असं ऋताचं म्हणणं आहे. ऋता म्हणाली, “अलिकडेच घडलेला एक प्रसंग आहे. एका पार्टीमध्ये कोणीतरी माझ्या वजनाबाबत भाष्य केलं होतं. कारण मध्यंतरी माझं वजन वाढलं होतं”.
आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”
“त्या एका व्यक्तीने पार्टीमध्ये असं म्हटलं होतं की, “बरं झालं ऋताचं वजन वाढत आहे. म्हणजे तिला कामं तरी मिळणार नाहीत. निदान तिची कामं आम्हाला मिळतील”. मी त्यावेळी या पार्टीमध्ये नव्हते. मला माझ्या एका जवळच्या व्यक्तीने याबाबत सांगितलं. मी माझं वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत होते”.
“दरम्यान यावेळी मी बऱ्याच प्रसंगांचा सामना करत होते. पण माझ्याबाबत केलेली अशी कमेंट ऐकून मला असं वाटलं की, लोक आपल्याबाबत असं कसं बोलू शकतात? स्पर्धा ही सगळीकडेच आहे. मला काम मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची गरज वाटत नाही. पुढे जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे पाय खेचणं चुकीचं आहे. मी तोंडावर सगळं बोलते. मला उघडपणे बोलण्याची भीती नाही. कारण माझं काम खरं आहे”. ऋताने अगदी दिलखुलासरणे काही गोष्टींबाबत खुलासा केला.