अभिनेत्री ईशा केसकरला झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ मालिकेमुळे अधिक लोकप्रियता मिळाली. तिचा काही दिवसांपूर्वीच ‘सरला एक कोटी’ चित्रपट प्रदर्शित झाला. ईशाच्या या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली. ईशा तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. पण त्याचबरोबरीने तिचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. ईशा काही वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे.
ऋषी व ईशाने त्यांच्या नात्याची सोशल मीडियाद्वारे जाहिरपणे कबुली दिली. दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. तसेच एकमेकांवर असलेलं प्रेम ईशा व ऋषी खुलेपणाने व्यक्त करतात. आता ईशाने बॉयफ्रेंडबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशाला तू शेवटचं डेटला कधी गेली होती? असं विचारण्यात आलं. यावेळी ईशा म्हणाली, “खूप दिवस झाले मी डेटलाच गेले नाही. आम्ही दोघंही दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये चित्रीकरण करत आहोत. पण आमचं काम चांगलं सुरू आहे. प्रेम वगैरे नंतर होत राहिल. तुम्हीसुद्धा हे लक्षात ठेवा.”
आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था
ईशा व ऋषी सध्या दोघंही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यग्र आहे. ऋषीही येत्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसेल. तर ईशाच्या हातीही काही प्रोजेक्ट्स आहेत. मात्र एकमेकांपासून लांब असूनही दोघंही मनाने एकत्र आहेत याचा ईशाला आनंद आहे. हे तिच्या बोलण्यामधूनही दिसून आलं.