लोकप्रिय मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले (Kishori Godbole)ने नाटक, टीव्ही मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हिंदी-मराठीमध्ये अभिनेत्रीने काम केले आहे. किशोरी गोडबोलेने विविध धाटणीच्या भूमिका आजपर्यंत साकारल्या आहेत. ‘चुटकी बजाके’, ‘मिसेस तेंडुलकर’ या मालिकांतील अभिनेत्रीच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाली. ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेत किशोरी गोडबोलेबरोबर स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत स्वप्नील जोशीबरोबरच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे.

तोपर्यंत मला माहीत नव्हतं…

किशोरी गोडबोलेने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेता स्वप्नील जोशीबरोबरच्या मैत्रीबाबत बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “‘अधुरी एक कहाणी’च्या शूटिंगला आम्ही सुरुवात केली. प्रॉडक्शन मॅनेजर मला फोन करीत होते. तर, त्यांचा नंबर माझ्याकडे नव्हता. अनोळखी नंबर असल्याने मी त्या फोनला प्रतिसाद दिला नाही. स्वप्नीलचा मला फोन आला की, अगं, ते तुला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आधी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. खूप चांगले लोक आहेत. त्यानंतर मी त्यांना परत फोन केला. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की, स्वप्नीलही त्या मालिकेत काम करतोय. सेटवर गेल्यानंतर समजलं की, तो काम करणार आहे. त्याआधीही आम्ही काम केलं होतं.संत ज्ञानेश्वर म्हणून एक मालिका होती, त्यामध्ये काम केलं होतं. अजून एका मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर असणारी कम्फर्ट लेव्हल माहीत होती. तो माझा खूप चांगला मित्रही आहे. त्यामुळे प्रत्येक नात्यात किंवा पात्रांमध्ये जशी केमिस्ट्री असते, तशी केमिस्ट्री होती. कारण- आम्ही मित्र आहोत.”

R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
mamta kulkarni marathi bramhan family
मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, ती ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींची आहे नातेवाईक

अजूनही तुमच्यात बोलणं होतं का, या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले, “क्वचित होतं. कारण- एक प्रोजेक्ट संपला ना तसा तेवढा रोजचा संवाद होत नाही. कामाशिवाय फोन, मेसेज करेन, अशी मी नाहीये. चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला माहीत नाही. पण, मी अशी आहे. त्यामुळे आपलं घर आणि शूटिंग एवढंच मला येतं. पण, जेव्हा तो सईचं एवढं यश बघतो किंवा माझी एखादी छान जाहिरात बघितली की, तो मेसेज करतो. किंवा त्याची एखादी फिल्म बघितली आणि मेसेज केला की लगेच त्याचा रिप्लाय येतो. म्हणजे आम्ही अजूनही मित्र आहोत”, असे म्हणत अभिनेता स्वप्नील जोशीबरोबर अजूनही मैत्री असल्याचे किशोरी गोडबोलेने म्हटले आहे.

किशोरी गोडबोलेची मुलगी अ‍ॅपल कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर विविध विषयांवर व्हिडीओ बनवताना दिसते, त्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. किशोरी गोडबोले ‘खबरदार’, ‘वन रूम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फुल ३ धमाल’, या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘अधूरी एक कहाणी’ या मालिकेतून तिला एक वेगळी ओळख मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

स्वप्नील जोशीच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो नुकताच नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्नील जोशीबरोबर हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगांवकर महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्याबरोबरच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जिलबी या चित्रपटातदेखील अभिनेत्याने एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आगामी काळात स्वप्नील जोशी ‘चिकी चिकी बुबूम बूम’, ‘सुशीला – सुजित’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader