गेली अनेक दशकं मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे-विज यांना ओळखले जाते. किशोरी शहाणेंनी त्यांच्या अभिनयाने ९० चं दशक गाजवलं. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. त्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किशोरी शाहणे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या त्यांच्या नवीन गाडीची झलक दाखवताना दिसत आहे. यावेळी त्या गाडीची पूजा करताना आणि त्यात केक कापून सेलिब्रेशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : मधुराणी प्रभुलकरने पुरस्कार सोहळ्यादरम्यान नेसली ‘या’ खास व्यक्तीची साडी, म्हणाली “त्यांची ठेवणीतली…”

यावेळी किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी ही दिसत आहे. “आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्रीची पतीबरोबर मालदीव सफर; रोमँटिक फोटो शेअर करीत म्हणाली….

या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी यावर कमेंट करत खूप खूप शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.