अभिनेत्री क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘जत्रा’, ‘फक्त लढं म्हणा’ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेत्री ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध व्हिडीओ, तिच्या जुळ्या मुलींचे किस्से चाहत्यांना सांगते. अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “एक नवी सुरुवात…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री लवकरच हिंदी मालिकेत झळकणार, शेअर केला प्रोमो

क्रांती रेडकरने तिच्या हेअर स्टायलिस्टचे कौतुक करण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. “तुझ्यासाठी मोठा निबंध लिहिला तरी कमी पडेल…ही फक्त माझी हेअर स्टायलिस्ट नसून माझी खूप जवळची मैत्रीण आहे. माझ्या कठीण काळातही ती कायम माझ्याबरोबर होती. नीलू माझ्याबरोबर सदैव अशीच राहा” असे क्रांतीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : नम्रता संभेरावनं दाखवली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील रिहर्सल, म्हणाली….

क्रांतीने या पोस्टसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीची हेअर स्टायलिस्ट तिला जेवण भरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ आणि पोस्ट पाहून अनेकांनी “क्रांती तू खूप लकी आहेस”, “तुमची मैत्री अशीच ठेवा” अशा कमेंट्स केल्या आहेत. मात्र, काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून नाराजी दर्शवली आहे. अशाच एका युजरला क्रांतीने कमेंटमध्ये उत्तर दिले आहे.

हेही वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठी यांना पितृशोक, वडील पंडित बनारस त्रिपाठींचे निधन

एका नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या व्हिडीओवर “स्वत:च्या हाताने जेवायला वेळ नसेल, तर अशा करिअर किंवा प्रोफेशनचा काय उपयोग? एवढं दुर्लक्ष करु नका…” अशी कमेंट केली आहे. या युजरला स्पष्ट उत्तर देत क्रांती म्हणाली, “काही वेळा मी सुद्धा तिला भरवते. माणसाचं नातं समजून घ्या.”

दरम्यान, लवकरच क्रांतीने दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी तिने ‘काकण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kranti redkar replied to netizen who commented on her video sva 00
Show comments