मराठी सिनेसृष्टीत क्रांती रेडकरने तिच्या अभिनय व नृत्य कौशल्यानं एक वेगळी छाप उमटवली आहे. इतकंच नाही तर तिनं दिग्दर्शन क्षेत्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी ही सर्वगुण संपन्न असलेली क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. नुकताच क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तिची एक मुलगी शंकर भगवान यांना फोन लावायला सांगताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील ‘ही’ अभिनेत्री झळकणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत

अभिनेत्री क्रांती रेडकरने काही तासांपूर्वीच आपल्या लेकीचा हा गोड व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये क्रांतीची एक लेक आपली आई देव बाप्पाच्या घरी जायला नको म्हणून शंकर भगवान यांना फोन लावण्यासाठी सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “जर माझ्या मुलीचा जन्म गाझामध्ये झाला असता तर…” स्वरा भास्करच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

क्रांतीच्या गोंडस लेकीच्या या व्हिडीओवर अमृता खानविलकर, सोनाली खरे यांच्यासह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच “किती निरागसपणा आहे”, “सही है”, “खूप छान”, “आईची जागा नेहमी पहिल्या स्थानावर असते”, अशा प्रतिक्रिया क्रांतीच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा –‘नियम व अटी लागू’ नाटक पाहून संजय मोनेंनी अमृता देशमुखची ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी केली होती तुलना, म्हणाले “रंगमंचावर…”

हेही वाचा – क्रांती रेडकरने शेअर केला लेकींच्या गरबा डान्सचा व्हिडीओ, म्हणाली…

दरम्यान, यापूर्वी क्रांतीने पती समीर वानखेडे मुलीचा अभ्यास घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये समीर वानखेडे मुलीचा हात पकडून काही इंग्रजी वाक्य लिहिताना पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ देखील चांगलाच चर्चेत आला होता.