मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर ही कायमच चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्याबरोबरच क्रांती ही तिच्या जुळ्या मुलींच्या गंमतीजमतीही पोस्ट करत असते. नुकतंच क्रांतीने तिच्या जुळ्या मुली कशा दिसतात याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांती रेडकर ही इन्स्टाग्रामवर कायमच चर्चेत असते. क्रांतीने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने पती समीर वानखेडे आणि त्यांची बहिण यास्मिन वानखेडे यांचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. याबरोबर तिने त्याला हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : क्रांती रेडकरला मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ अभिनेत्याबरोबर जायचं डेटवर, म्हणाली “तो कामात…”

“अनेक लोक माझ्या जुळ्या मुली कशा दिसतात याबद्दल मला सतत विचारतात. त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की, माझी दोन्हीही मुलं ९५ टक्के अशीच दिसतात”, असे कॅप्शन क्रांती रेडकरने दिले आहे. त्याबरोबर तिने समीर वानखेडे आणि यास्मिन वानखेडे यांना टॅगही केले आहे.

आणखी वाचा : क्रांती रेडकरने सांगितला मुंबई आणि लंडनमधील ट्राफिकचा भन्नाट किस्सा, म्हणाली “फक्त एकावर गाडी चढवू शकत नाही म्हणून…”

दरम्यान क्रांती रेडकर हिने २०१८ मध्ये दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. झिया आणि झायदा अशी त्यांची नावं आहेत. त्या आता ५ वर्षांच्या आहेत. त्या दोघीही क्रांतीची दमछाक करताना दिसतात. ती तिच्या लेकीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असताना दिसतात. क्रांतीने आपल्या मुलींचे चेहरे आतापर्यंत कधीच दाखवले नाहीत.