अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. क्रांती नेहमी दैनंदिन जीवनातल्या घडामोडी मजेशीर अंदाजात चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसेच तिच्या जुळ्या मुलीचे व्हिडीओ तर कायमच चर्चेचा विषय असतात. अभिनेत्री लेकींच्या करामतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी पक्ष्यांसाठी गवत म्हणून लेक छबलीने स्वतःचे केस कापल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला होता. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला. आता क्रांतीने लेकींच्या गरबा डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री; झळकला महत्त्वाच्या भूमिकेत
क्रांती रेडकरच्या लेकी अनेकदा गाणी गाताना दिसल्या आहेत. पण आता जबरदस्त गरबा डान्स करताना पाहायला मिळाल्या आहेत. क्रांतीने याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकी पंजाबी ड्रेसमध्ये दिसत असून गरबा डान्स करताना पाहायला मिळत आहे. क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत गरबा टाईम याचा जीआयएफ शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: “देशात दोन गोष्टी विकल्या जातात सेक्स आणि…”, राज कुंद्राचं वक्तव्य चर्चेत
तसेच क्रांतीने पती समीर वानखेडे मुलीचा अभ्यास घेतानाचा रील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे मुलीचा हात पकडून काही इंग्रजी वाक्य लिहिताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, “माणुसकी शिल्लक आहे”
हेही वाचा – Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…
दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत ती पाहायला मिळाली होती. लवकरच क्रांतीने दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी तिने ‘काकण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.