मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं अभिनय क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. क्रांती अभिनयाबरोबरच उत्तम नृत्य आणि दिग्दर्शनही करते. अशी सर्वगुण संपन्न असलेली अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांबरोबर दैनंदिन जीवनात येणारे अनुभव शेअर करत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये क्रांतीनं तिला गेले चार-पाच दिवस सतावत असलेल्या दुःखाबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा – ‘हा’ अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका, पण…; दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा

Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत क्रांती सांगतेय की, “आपल्या आयुष्यात अनेक दुःख असतात, पण एक दुःख असं आहे जे मला गेले चार-पाच दिवस सतावतं आहे. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू या. पहिली शिंक येऊन गेल्यावर दुसरी शिंक जेव्हा येत असते आणि मग ती येत नाही, त्याचं तुम्हाला दुःख माहितेय का? वाईट.”

हेही वाचा – “‘मुळशी पॅटर्न’ पाहिल्यावर कॉलर तोंडात पकडून कौतुक करणाऱ्या सलमानने…”, उपेंद्र लिमये यांचं विधान

क्रांतीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीनं म्हटलं आहे की, ‘तुमचं दुःख ऐकून मला खूप दुःख झालं.’ तर दुसऱ्या एका नेटकरीनं लिहिलं आहे की, ‘कुणाचं काय तर कुणाचं काय… ‘तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे की, ‘भयंकर आहे रे बाबा.’ शिवाय बऱ्याच नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी प्रतिक्रियेत टाकले आहेत.

हेही वाचा – “… तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता”; दिग्दर्शक प्रवीण तरडे खंत व्यक्त करीत म्हणाले…

दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात ती परीक्षक म्हणून काम करत आहे. तसेच क्रांतीचा ‘रेनबो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा तिनं सांभाळली आहे.