मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटातून तिनं काम केलं आहे. अभिनयाबरोबर क्रांतीनं ‘काकण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तिच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला दुसरा ‘रेनबो’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रांती अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी नेहमी तिचे अनुभव सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिनं एक मजेशीर हेअर ड्रसरचा अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत क्रांती सांगतेय की, “मी सांगत असलेला किस्सा बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेला आहे. माझी एक नेहमीची हेअर ड्रेसर आहे, तिचं नाव निलम आहे. जेव्हा निलम गैरहजर असते, तेव्हा ती मला तिच्या जागी कोणीतरी देते, नाहीतर प्रोडक्शन देतं. एकेदिवशी निलमच्या जागी एक हेअर ड्रेसर आली होती. आणि तिच्या जो तोंडाला वास होताना, तो थेट चक्कर आणेल असा होता. याची मी तिला सारखी हिंट देत होते. मी तुला मिंट देऊ का? घे थोडं मिंट खा. तेव्हा ती म्हणायची, मला मिंट आवडतं नाही. मग मी पुन्हा म्हणायचे, च्विगम? अगं थोडं घे. ती म्हणायची नको, तो पेपर मिंटचा वास येतो, त्यामुळे मला कसंतरी होतं.”

हेही वाचा – “उगाचच कुणाच्यातरी पदरी…”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर दिग्दर्शक विजू मानेंचे वक्तव्य

“मग मी मनातल्या मनात म्हणायचे, अगं तुझ्या तोंडाच्या वासाचं काय करूया, त्याने मला कसंतरी होतंय त्याचं काय? तिला त्याची काही पडलीच नव्हती. बरं तिला हे सांगायचं कसं हा खूप मोठा प्रश्न पडला होता. त्यामुळे मी तिला काही सांगितलंच नाही. मग ती माझे केस स्ट्रेट करायला लागली. यावेळी ती सतत बोलायची. मी तिला म्हटलं, तू जरा शांत राहा. तरीही ती बोलतंच होती. मग मी माझं डोकं झटकलं आणि तिची स्ट्रेटिंग मशीन माझ्या डोक्याला लागली. ती इतकी घाबरली की, जिथे लागलंय ते फुंकर मारत सतत सॉरी, सॉरी बोलू लागली. मॅडम आग होतेय का? असं विचारत ती जोरजोरात फुंकूर मारतं होती. यामुळे या एका मिनिटांत तिच्या तोंडाच्या वासामुळे मी १७ हजार वेळा मेले,” असं क्रांती म्हणाली.

हेही वाचा – ‘त्या’ कृतीमुळे चिडलेल्या काजोलच्या आईने धर्मेंद्र यांना लगावली होती कानशिलात, नंतर काळा धागा घेऊन…

अभिनेत्रीच्या या मजेशीर व्हिडीओवर सई ताम्हणकर, ऋतुजा बागवे, रेशम टिपणीस यांनी हसण्याचे इमोजी प्रतिक्रियेत टाकले आहे. तसेच एका नेटकरी लिहिलं आहे की, “तुम्हा एक सांगू का? तुम्ही तिला थेट सांगायला पाहिजे होतं. इतक्या वेळ्या बोलू सुद्धा समजलं नसेल तर थेट बोलणं हे चांगलं होतं. आता हा व्हिडीओ बघेल, तर तिला तिची लाज वाटेल. आणि जे तिला ओळखतात त्यांनाही समजेल. त्यापेक्षा तुम्ही तिला थेट सांगायला पाहिजे होतं.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं की, “एका मिनिटांत १७ हजार वेळा मेले, काय डायलॉग आहे..” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहिलं की, “देवा. तू सहन केलं. मी नसतं सहन केलं.”

हेही वाचा – तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा डान्स; नेटकरी म्हणाले, “अजय देवगण व सनी देओल…”

दरम्यान, सध्या क्रांती रेडकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहेत. तिच्याबरोबर सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक व लेखक अभिजीत पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kranti redkar wankhede shares her hairdresser experience pps
Show comments