अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या अभिनय व नृत्य कौशल्याने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. एवढंच नव्हे तर तिने दिग्दर्शन क्षेत्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी ही सर्वगुण संपन्न असलेली अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामधून तिने मुलींच्या टोपण नावामागची गोष्ट सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांच्या जुळ्या मुलींची खरी नावं ‘झिया’ व ‘जायदा’ आहे. पण दोघींना ‘छबील’ व ‘गोदो’ अशी टोपण नाव आहेत. क्रांती तिच्या अनेक व्हिडीओमध्ये दोघींना टोपण नावानेच हाक मारताना दिसते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रांती सांगतेय, “छबीलने आपलं नवीन नाव ठेवलं आहे लुकस वानखेडे आणि आम्हाला सांगते, माझं टोपण नाव आहे लुका. जवळपास एखाद्या भाईच नाव, लुका भाई वानखेडे असं. गोदोचं नाव गोदोचं आहे.”

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

पुढे अभिनेत्री म्हणते, “तुम्ही लोक मला सारखे विचारता मुलींची नाव अशी का आहेत? ‘छबील’च्या मागची गोष्ट काय आहे तर ‘छबील’ म्हणजे झाशीची राणी यांचं टोपण नाव छबिली होतं. त्याच्यावरून समीरने छबिली नाव ठेवलं. पण नंतर ते ‘छबील’ झालं. ‘वेडिंग फॉर गोदो’ जी काही कादंबरी, नाटक आहे त्यावरून गोदोचं नाव आहे. ‘छबील’ झाल्यानंतर आम्ही ज्या बाळाची वाट बघतं होतो ती गोदो होती. आता गोदोची गोदावरी झालीये. कारण माझी आई गोदावरी, गोदावरी तिच्या मागे करत असते. गोदोची गोदावरी झाली. पण ‘छबील’चा लुकस झालाय त्याचं काय करायचं? लुकस द लुका, लुका भाई.”

क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मला नावाचा मागची गोष्ट आवडली”, “लुका बाळ”, “गोड नावं आहेत”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video : पोपटी साडी, नाकात नथ अन्…; ‘वाजले की बारा’ लावणीवर माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात झळकली होती. तिने या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. याशिवाय क्रांतीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला दुसरा ‘रेनबो’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी तिने जितेंद्र जोशी आणि ऊर्मिला कोठारे अभिनीत ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kranti redkar wankhede tells the story behind the nicknames of the twin girls pps
Show comments